शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात पालिकेच्या व्यापारी गाळ्याचे भिजत घोंगडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:34 IST

खामगाव: जिल्ह्यातील  सर्वात मोठय़ा खामगाव नगरपालिकेवर बहुमताने घेतलेला ठराव परत घेण्याची नामुश्की ओढवली असून, त्या दृष्टिकोनातून पालिकेने तयारी चालविल्याची माहिती आहे. खामगाव पालिकेने निर्माण केलेल्या व्यापारी संकुलातील २९ दुकानांबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत होत नाही. त्यामुळे बहुमताने पारित असलेला ठराव आता परत घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देव्यापारी संकुलात १९ गाळे: पालिकेवर ठराव परत घेण्याची नामुश्की!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा खामगाव नगरपालिकेवर बहुमताने घेतलेला ठराव परत घेण्याची नामुश्की ओढवली असून, त्या दृष्टिकोनातून पालिकेने तयारी चालविल्याची माहिती आहे. खामगाव पालिकेने निर्माण केलेल्या व्यापारी संकुलातील २९ दुकानांबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत होत नाही. त्यामुळे बहुमताने पारित असलेला ठराव आता परत घेण्यात येणार आहे. शहरातील मोक्याच्या जागेवर व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली. व्यापारी संकुल निर्माण झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून भाडेतत्त्वावर देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होत नाही. दरम्यान, खामगाव पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी व्यापारी संकुल भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठराव संमत करण्यात आला. बहुमताने संमत झालेल्या या ठरावाला विरोधकांनी विरोध चालविला आहे. त्यामुळे दोन-तृतीयांश बहुमतापासून हा ठराव कोसोदूर असल्याने, व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने देण्याचा ठराव तांत्रिक अडचणीत सापडला आहे. परिणामी, हा ठराव मागे घेण्याच्या हालचाली चालविल्या आहेत.

खामगाव पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान!नगरपालिका प्रशासनाच्यावतीने नगरपालिकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस २९ गाळे असलेल्या व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे; मात्र निर्मितीपासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या व्यापारी संकुलाचे ग्रहण नजीकच्या काळात सुटणार नसल्याचे दिसते. या व्यापारी संकुलातील दुकाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि भाजपच्या सत्ताकाळात बहुमताने हा ठराव संमत होतो. मात्र, दोन तृतीयांश बहुमत मिळत नसल्याने हा ठराव अधांतरी राहत आहे. परिणामी, व्यापारी संकुलातील गाळ्यांची  अनामत रक्कम, भाडे आणि अनामत रकमेचे व्याज असे एकूण वर्षाकाठी सुमारे चार कोटी रुपयांचे पालिकेचे नुकसान होत आहे.

खामगाव पालिकेपेक्षा जळगाव अग्रेसर!खामगाव नगरपालिकेच्या कितीतरी वर्षांनंतर जळगाव नगरपालिकेच्यावतीने जळगाव जामोद येथे व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. खामगाव येथे व्यापारी संकुल बांधून तयार असताना, जळगाव येथे व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू झाले. बांधकामानंतर लगेचच जळगाव पालिकेने ठराव संमत करीत, जळगाव येथील व्यापारी संकुल भाडेतत्त्वावर देण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे खामगाव पालिकेपेक्षा जळगाव पालिका या कामी अग्रेसर असल्याचे दिसून येते.

खामगाव नगरपालिकेत विरोधाला विरोध ही प्रवृत्ती बळावत आहे. व्यापारी संकुलातील दुकाने भाड्याने देण्याचा ठराव तांत्रिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून सदर ठराव पारित करण्यात येणार आहे.- ओम शर्मा, नगरसेवक, भाजप. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा