शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात शहरातील ‘कबड्डी’चा वाद शिगेला; दोन वाहने पेटवली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:49 IST

खामगाव: शहरात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच आणखीही कायम असल्याचे दिसते.  वादाचा वचपा काढण्यासाठी शहरातील शिवाजी नगर आणि सती फैल भागात दोन वाहने पेटविण्यात आली. ही घटना शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देशनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच आणखीही कायम असल्याचे दिसते.  वादाचा वचपा काढण्यासाठी शहरातील शिवाजी नगर आणि सती फैल भागात दोन वाहने पेटविण्यात आली. ही घटना शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली.  शहरातील  शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळाडूच्या प्रोत्साहनावरून वाद झाला. या  वादाचे पर्यवसान त्यावेळी दगडफेक व तोडफोडीत  झाले. यात चार जण जखमी झाले होते, तर  १0-१२  वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.  बुधवारी सायंकाळपासून या भागात सती फैल विरुद्ध शिवाजी फैल असा वर्चस्वाचा ‘सामना’ रंगत असून, गुरुवारी रात्री ९.३0 वाजता दोन्ही फैल अमोरासमोर झाले. कबड्डीच्या वादाची धुसफूस कायम असल्याने, या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यू. के. जाधव यांची बदली झाली, त्यानंतर नवीन ठाणेदार संतोष ताले पदभार स्वीकारण्यापूर्वीच शनिवारी पहाटे कबड्डीच्या वादातून दोन वाहने जाळण्यात आली. यामध्ये   एमएच २८ टी - २६९२ या ऑटोसह व एमएच २८ व्ही- ६९0३ या  डस्टर कारचा समावेश आहे.  जाळण्यात आलेला ऑटो रेखा प्लॉट भागातील सूरज शिनगारे यांचा असून, डस्टर कार ही तानाजी व्यायामशाळेचे सचिव ओंकारआप्पा तोडकर यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकाच समुदायातील दोन गट लहान-सहान गोष्टीवरून कुरापती उकरून काढत असल्याची चर्चा परिसरात आहे. दरम्यान, ओंकारआप्पा तोडकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरोधात कलम ४३५, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला, तर शिनगारे यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहर पोलिसांनी शिवाजी नगर भागात चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे.

कबड्डीचा वाद गोकूळ नगरपर्यंत!कबड्डीच्या सामन्याच्या वादातून शहरातील शिवाजी फैल आणि सती फैलातील बलाढय़ शक्तींमध्ये सामना रंगत आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या या वादाची धग आता शहरातील गोकूळ नगरपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. गोकूळ नगरातील ओंकारआप्पा तोडकर यांच्या निवासस्थानासमोर उभी असलेली कार पेटवून देण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावKabaddiकबड्डी