शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘खडकपूर्णा’ पाच वक्र द्वारातून पाण्याचा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:08 IST

पाच वक्र द्वारातून ३,८०८ क्युसेक (१०८ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून जवळपास आठ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून, ३१ जुलै रोजीही पाच वक्र द्वारातून ३,८०८ क्युसेक (१०८ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.गेल्या २४ जुलै रोजी या प्रकल्पाची पाणी पातळी ही ७० टक्क्यांवर पोहोचली होती. त्यातच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. बुलडाणा, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील नदीकाठच्या ३६ पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी ४५ हजार क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सलग ५६ तासांपेक्षा अधिक काळ या वेगाने तो होता. त्यानंतर प्रकल्पात पाण्याची आवक कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला; मात्र त्यानंतरही मर्यादीत स्वरुपात प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच होता.खडकपूर्णा प्रकल्पाच्या मराठवाड्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून दमदार पाऊस होत असल्याने प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात येत आहे.आतापर्यंत जवळपास ६० दलघमीपाणी प्रकल्पातून नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे. त्याचा फायदा हा दुधना आणि येलदरी या मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांना झाला आहे. सोबतच बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी खडकपूर्णा नदीवर असलेले तीन कोल्हापुरी बंधारेही तुडूंब भरले आहेत.

टॅग्स :khadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरbuldhanaबुलडाणा