शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

७ क्विंटल ३५ किलोचा महारोठ

By admin | Updated: February 19, 2015 00:14 IST

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील उत्सव; शंकरगिरी महाराज संस्थानमध्ये महाशिवरात्री यात्रामहोत्सव.

खामगाव (जि. बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील श्री शंकरगिरी महाराज संस्थानमध्ये यावर्षीही महाशिवरात्रीनिमित्त ७ क्विंटल ३५ किलोचा महारोठ बनविण्यात आला. तसेच बुधवारी दिवसभर यात्रा महोत्सव सुध्दा धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. संग्रामपूर तालुक्यात संग्रामपूर पासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसी झांसी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीच्या पर्वावर शंकरगीरी महाराज यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या पर्वावर शेकडो वर्षांंपूर्वी महान तपस्वी शंकरगिरी महाराजांनी सुरु केलेली रोठ तयार करुन महाप्रसादाची परंपरा आजही कायम आहे. या महारोठाच्या सेवनाने सुख शांती प्राप्त होवून आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रध्दा असते. त्यामुळे मोठय़ा संख्येने भाविक हा महारोठाचा प्रसाद घेण्यासाठी येथे येतात. यावर्षी महारोठ ७ क्विंटल ३५ किलो चा तयार करण्यात आला होता. हा महारोठ तयार करण्यासाठी काजू, बदाम, किसमिस, सोफ, जिरा, केसर, विलायची या सोबतच ८0 लिटर दुध, ७0 किलो तूप, दीड क्विंटल साखर, दीड क्विंटल गव्हाचे पीठ वापरण्यात आले. १0 मीटर सूती कापड व त्यावर केळीची पाने लावून रात्रभर हा महारोठ तयार करण्यात आला. महाशिवरात्रीच्या रात्री ९ वाजेपासून २५ -३0 भाविकांकडून हा महारोठ तयार करणे सुरु होवून दुसर्‍या दिवशी पहाटे महारोठ तयार झाला होता. १८ फेब्रुवारी रोजी दिवसभर या महारोठाचा प्रसाद भाविकांना वितरीत करण्यात आला. या महारोठाचा प्रसाद घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील तसेच लगतच्या अकोला, जळगाव व अमरावती या जिल्ह्यातील भाविकांनीही हजेरी लावली होती. यामुळे काल तसेच आज पळशी झांशी येथे हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते.