शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीपासून स्वतः ला दूर ठेवा...काळजी घ्या! - डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:41 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सध्या कोरोना व्हायरसने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. त्या पार्श्वभुमिवर नागरिकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे कोणालाही न जुमानता ग्रामीण भागात मोकाट फिरणारांपासून नागरिकांनी स्वत:ला दूर ठेवावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. खामगाव तालुक्यात मोठ्या शहरातून आलेल्या ५२८४ जणांची तपासणी आरोग्य विभागाने केली असून ३७१५ जणांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले आहे. खामगाव तालुक्यात मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय अटाळी ७४२, बोथाकाजी ८०१, गणेशपूर १०१०, रोहणा ६१४, पिंपळगाव राजा ८७२, एनयुएचएम खामगाव २३७, सामान्य रुग्णालय खामगाव १००८ अशा ५२८४ जणांची आरोग्य तपासणी २९ मार्च रोजी सायंकाळपर्यंत करण्यात आली होती. तपासणी करण्यात आलेल्यांना ‘होमक्वारंटीन’ करण्यात आले असून यात अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७४२, बोथाकाजी ५७३, गणेशपूर २३२, रोहणा ६१४, पिंपळगावराजा ८७२, एनयूएचएम खामगाव २३७ तर सामान्य रूग्णालय खामगावअंतर्गत ४४५ अशा ३७१५ जणांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले आहे. उर्वरित लोकांना होम क्वारंटीन करणे सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.५० हजार पत्रकांचे वाटप!पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने ग्राम पंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. ग्राम पंचायंतींच्या माध्यमातून आतापर्यत ५० हजार जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. जंतुनाशक फवारणीची दुसरी फेरी!कोरोनाच्या पार्श्वभुमिवर ग्रामीण भागात संसर्गाचा धोका कमी व्हावा, यासाठी खामगाव तालुक्यातील ९७ गावांमध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी करण्यात आली आहे. यामुळे जंतुनाशक फवारणीची पहिली फेरी पुर्ण झाली असून आता फवारणीच्या दुसºया फेरीला सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. होम क्वारंटीन करण्यात आलेल्यांनी अजिबात बाहेर फिरू नये. जे लोक विनाकराण फिरत असतील त्यांच्यापासून इतरांनी दूर राहावे. डॉ. दिनकर खिरोडकरतालुका आरोग्य अधिकारी
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव