शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवा- डॉ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:46 IST

माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असून समाजात माणुसकी ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी येथे केले

ठळक मुद्देखामगाव येथील आईसाहेब मंगल कार्यालयात आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माणसाला कोणत्याही धर्मात न विभागता, सामाजिक समतेसाठी प्रत्येकाने झटले पाहीजे, असे आवाहन केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :    सांप्रदायिक सद्भाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा आहे. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असून समाजात माणुसकी ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी येथे केले.

खामगाव येथील आईसाहेब मंगल कार्यालयात आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून हिवरा आश्रमचे गजानन शास्त्री, भिवंडी येथील पोलिस पब्लीक मोहल्ला कमेटीचे सदस्य सलाऊद्दीन, किर्तनकार सुशील वणवे, फादर शांतवन फुटेकर, भन्तेजी बुध्दरत्न, ग्यानीजी महेंद्रसिंह, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सल्लाउद्दीन यांनी प्रेम हाच जगातील सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगितले. तर गजानन शास्त्री महाराजांनी जगातील कोणताही धर्म वाईट नाही. मात्र, समाजातील काही आडमुठ्या लोकांमुळे सामाजिक तेढ निर्माण होत असून, माणसाला कोणत्याही धर्मात न विभागता, सामाजिक समतेसाठी प्रत्येकाने झटले पाहीजे, असे आवाहन केले. 

 याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या उद्बोधनातून सामाजिक एकतेचा संदेश दिला. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले, ग्रामीण पोलिस स्टेशनचे रफीक शेख, पि.राजा पोलिस स्टेशनचे निरिक्षक निखिल फटींग, जलंब पोलिस स्टेशनचे निरिक्षक संदीप गाढे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाºयांची उपस्थिती होती. या सभेला शांतता समिती सदस्यांची उपस्थिती मोठ्यासंख्येने होती. प्रास्ताविक अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांनी केले. संचालन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षण रविंद्र देशमुख यांनी केले.

टॅग्स :khamgaonखामगाव