शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिवरा आश्रम परिसरात काेराेनाची लाट ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

हिवरा आश्रम : संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने सर्वतोपरी नागरिकांच्या ...

हिवरा आश्रम : संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने सर्वतोपरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शर्थीचे प्रयत्न केले आणि त्याचीच फलश्रुती म्हणजे दुसरी लाट आटाेक्यात आली आहे़ परिसरात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात कमी झाली आहे़ ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या काेविड सेंटरमधून दाेन रुग्णांना साेमवारी सुटी देण्यात आली़

आठ-दहा दिवसांपूर्वी हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन झाले असून परिसरातील नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबली आहे़ परिसरातील रुग्ण या रुग्णालयाचा लाभ घेत आहेत. सद्यस्थितीत या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. कर्मचारी वर्गाचा प्रामाणिकपणा आणि मेहनतीमुळे रुग्ण सुखावले असून कोरोनाविषयीची भीती नष्ट झाली आहे. साेमवारी दाेन काेराेना रुग्णांना सुटी देण्यात आली आहे़ दाेन्ही रुग्णांना टाळ्यांच्या गजरात निराेप देण्यात आला़ रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित धांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पागोरे, डॉ. बसवेश्वर धाडकर, डॉ. पल्लवी कुऱ्हाळे, डाॅ. शिवानी मिटकरी, डाॅ. अजहर शेख, किरण काकफळे, अश्विनी राजगुरू, अक्षय धोंडगे व इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत़