शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
4
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
5
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
6
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
7
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
8
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
9
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
10
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
11
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
12
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
13
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
14
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
15
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
16
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
17
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
19
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर

अंबाबरवा अभयारण्यात १ जूलैपासून जंगल सफारी बंद

By विवेक चांदुरकर | Updated: June 29, 2024 14:43 IST

या कालावधीत अंबाबरवा अभयारण्यातील जंगल सफारी तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

अझहर अली, संग्रामपूर: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन पावसाळ्यात कमीतकमी ३ महिने बंद ठेवण्याचे सुचना आहेत. त्या पृष्ठभूमीवर सर्व व्याघ्र प्रकल्प कोअर क्षेत्रामधील टुरिझम पर्यटकांसाठी १ जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत अंबाबरवा अभयारण्यातील जंगल सफारी तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

पावसामूळे दरडी कोसळण्याची शक्यता दाट असल्याने पर्यावरणीय पर्यटकांची सुरक्षेच्या दृष्टीने जूलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी जंगल सफारीवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात २७ जूनला उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभागाकडून सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय (वन्यजीव) ला पत्र प्राप्त झाले आहे. बफर क्षेत्रातील निसर्ग पर्यटन रस्ते पावसाळ्यात खराब होऊ नये तसेच संरक्षणावर विपरीत परिणाम होणार नाही. याची दक्षता घेण्यासंदर्भात पत्रातून सूचना करण्यात आली आहे. १५ हजार ८३९.७५ हेक्टर क्षेत्रफळात व्यापलेला अंबाबरवा अभयारण्यात वन्यप्राण्यांसह साग, साल, आवळा, बाभूळ, तेंदू, सालई. खैर, आंबा, अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, बांबू, बेहडा, धावडा, मोह, हिवर, उंबर, कुसुंब असे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सर्व वृक्ष या जंगलात बघायला मिळतात. काही वेली, झुडूपांसह औषधी वनस्पतींची या जंगलात भरपूर गर्दी आहे. या अभयारण्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून पर्यटक येताहेत. या निर्णयामुळे पर्यावरणीय पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अंबाबरवा अभयारण्यात १५ वाघांचा अधिवासअंबाबरवा अभयारण्यात १ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत १९ बीट मध्ये ७० ग्रीड तयार करून १४० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या कडून ट्रॅप कॅमेरा मधील डेटा वर विश्लेषण करण्यात आले असून अभयारण्यात १५ वाघांचे अधिवास असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये ३ नर, ५ मादी, ७ बछडे असे एकूण १५ वाघ सातपुड्यात डरकाळी फोडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठांकडून अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी बंद ठेवण्याचे आदेश कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने पूढील तीन महिन्यांसाठी अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी बंद राहणार आहे.- सुनील वाकोडे, वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), सोनाळा ता. संग्रामपूर

टॅग्स :buldhanaबुलडाणा