शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीपुत्र झाला न्यायाधीश

By admin | Updated: March 14, 2016 01:48 IST

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अल्पभूधारक शेतक री पुत्राची यशोगाथा.

मयूर गोलेच्छा /लोणार निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती सातत्याने तोट्यात येत असून, अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे मुलांचे शिक्षण, लग्न, वाढते कर्ज अशा संकटात जगणे असह्य झाल्यामुळे जिथे काही शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, त्याच ठिकाणी तालुक्यातील धायफळ येथील अल्पभूधारक शेतकरी सत्यभान मानकर यांच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्या मुलाचे नाव आहे, रवी सत्यभान मानकर.लोणार तालुक्यातील धायफळ येथील सत्यभान धारोजी मानकर यांच्याकडे ५ एकर जमीन असून, ती कोरडवाहू आहे. त्यामुळे जमिनीतून फार काही उत्पादन होत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी मुलांच्या शिक्षणावर भर दिला. सत्यभान मानकर यांना वसंता आणि रवी ही दोन मुले. दोघांचेही प्राथमिक शिक्षण गावातील जि.प. शाळेत व त्यानंतरचे शिक्षण लोणार येथील महाराणा प्रताप हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. रवी हा अभ्यासात हुशार होता. परंतु, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने रवीच्या भावाने आपले शिक्षण थांबविले आणि लहान भावाला पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ विद्यापीठात पाठविले. यावेळी रवीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी मोठय़ा भावाने सांभाळली. दरम्यान, वसंता याचे हृदयविकाराने निधन झाले. अशा परिस्थितीत न डगमगता मिळेल ते काम करून रवीने शिक्षण पूर्ण केले. तसेच लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधीश पदाची परीक्षा दिली. त्यात चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्याने रवीची न्यायाधीश पदावर निवड झाली. मुलाच्या यशामुळे वडिलांच्या डोळय़ात एकीकडे आनंदाचे तर दुसरीकडे धाकट्या मुलाच्या आठवणीने दु:खाचे अश्रू तरळत होते.