शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथील जिनिंगला ठोकले कुलूप; अधिकार्‍यांना घेराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:55 IST

चिखली : येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी आणलेला शेतमाल मोजून घेण्याऐवजी कोणतेही कारण न देता तीन दिवस खरेदी केंद्र बंद राहील, असे सांगून खरेदी केंद्र बंद केल्यामुळे येथे शेतमाल घेऊन आलेले सुमारे २00 शेतकरी आपल्या वाहनांसह अडकून पडले होते.  ही बाब आमदार राहुल बोंद्रे यांना कळताच त्यांच्या सूचनेवरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरेदी केंद्रावर जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, तहसीलदार आणि नाफेडचे मार्केटिंग अधिकार्‍यांना घेराव घातला; तसेच चिखली जिनिंगला कुलूप ठोकल्याने तडकाफडकी आदेश काढून खरेदी केंद्रावरील शेतमालाच्या मोजमापास सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देयुवक काँंग्रेसच्या आक्रमकतेने नाफेड खरेदी केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी आणलेला शेतमाल मोजून घेण्याऐवजी कोणतेही कारण न देता तीन दिवस खरेदी केंद्र बंद राहील, असे सांगून खरेदी केंद्र बंद केल्यामुळे येथे शेतमाल घेऊन आलेले सुमारे २00 शेतकरी आपल्या वाहनांसह अडकून पडले होते.  ही बाब आमदार राहुल बोंद्रे यांना कळताच त्यांच्या सूचनेवरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरेदी केंद्रावर जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, तहसीलदार आणि नाफेडचे मार्केटिंग अधिकार्‍यांना घेराव घातला; तसेच चिखली जिनिंगला कुलूप ठोकल्याने तडकाफडकी आदेश काढून खरेदी केंद्रावरील शेतमालाच्या मोजमापास सुरुवात करण्यात आली.येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर बैलगाडीसह, टॅक्टर व इतर मालवाहू वाहनातून सुमारे २00 शेतकरी आपला शेतमाल घेऊन आलेले होते.; परंतु सदर खरेदी केंद्रावर माल घेण्यास टाळाटाळ करीत कोणतेही कारण न देता पुढील दोन ते तीन दिवस खरेदी केंद्र बंद राहील, असे जाहीर केल्या गेल्याने शेतकर्‍यांची गैरसोय व नुकसान पाहता आ.राहुल बोंद्रे यांच्या निर्देशानंतर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश सुरडकर व कार्यकर्त्यांनी खरेदी केंद्र गाठून शेतकर्‍यांचा शेतमाल तातडीने मोजून घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, जिनिंग-प्रेसिंग संस्थेच्या कार्यालयात कोणीही हजर नसल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. कार्यकर्त्यांची ही आक्रमक भूमिका पाहताच जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक व तहसीलदार आदी अधिकारी केंद्रावर पोहोचले असता अधिकार्‍यांनाही घेराव घालण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी अधिकार्‍यांनी तातडीने संबंधिताना शेतमाल मोजून घेण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, युकाँचे रमेश सुरडकर, पिंटु गायकवाड, संजय गिरी, बाळु साळोख, भारत मोरे, पुरूषोत्तम हाडे, भगवान गायकवाड, संजय सोळंकी, राजू सावंत, किशोर साळवे, नंदु हाडे, संजय पडघान, प्रकाश आंभोरे, विश्‍वनाथ खोडके, दत्तात्रय देशमुख, विजय पडघान आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :chikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणा