शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी धर्माच्या जपणुकीसाठी ‘जिजाऊच्या लेकीची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 19:34 IST

khamgaon News सृजनशील उपक्रमाला आणि पुढाकाराला खामगावातील सर्व जाती-धर्मातील युवकांचा प्रतिसाद मिळत आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘थोर महात्मे होऊन गेले...चरित्र त्यांचे पहा जरा...आपण त्यांच्या समान व्हावे...हाच सापडे बोध खरा!’ उपरोक्त ओळींचा प्रत्यय आपल्या जीवनात अंगीकारत, खामगाव येथील एका जिजाऊच्या लेकीची जाती-धर्माच्या भींती तोडण्यासाठी धडपड सुरू आहे. ‘तिच्या’ सृजनशील उपक्रमाला आणि पुढाकाराला खामगावातील सर्व जाती-धर्मातील युवकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे खामगावात ‘रक्त’नात्याच्या धर्माची जपणूक होताना दिसत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. समाजातील जातीच्या भींती पाडायच्या असतील तर ‘रक्ता’च्या नात्याची निर्मिती होणं गरजेचं आहे. हाच धागा पकडत खामगाव येथील राजर्षी दिलीप पाटील या ध्येयवेड्या महिलेने समाजातील वाईट मार्गाला लागलेल्या आणि भांडखोर स्वभाव असलेल्या सर्व जाती धर्मातील युवकांशी संपर्क केला. खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात असलेल्या रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा भरून करण्यासाठी खारीचा वाटा उचलला. सुरूवातीचे काही वर्ष तिच्या नशीबी अपयश आले. मात्र, सातवर्षांपूर्वी मुस्लिम...बौध्द...आणि हिंदू समाजातील काही युवकांना तिचं म्हणणं पटलं. या युवकांनी ‘रक्त’धर्माच्या निर्मितीत पुढाकार घेतला.‘हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे...माणसाने माणसाशी माणसासम वागणे’...‘हर एक जाती को ब्लड बॅक एक कर देती है!... हर एक जाती का बंदा यहापर ‘खुदा’ बन जाता है!!’ या ओळी कृतीत उतरविल्या. रक्तधर्माच्या प्रचार, प्रसाराठी जीवतोडून पुढाकार घेतला. त्यामुळे  खामगाव आणि परिसरातील सिकलसेल आणि थॅलेसीमिया ग्रस्त रूग्णांची रक्ताची निकड कमी होण्यास मदत झाली.

 

 समाजातील वंचित, उपेक्षीत आणि गरजवंत रूग्णांना रक्ताची मदत करण्याचे भाग्य लाभतेय. त्यांच्या निरंतर सेवेत ‘तरूणाई’ची साथ असल्याचा अभिमान आहे.- राजश्री पाटीलखामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावSocialसामाजिक