काशीनाथ मेहेत्रे /सिंदखेडराजा राष्ट्रमाता जिजाऊंच्या रूपाने सिंदखेडराजाला जाज्वल्य ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मातृ तीर्थ नगरीतील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांची माहिती क्षणात उपलब्ध होण्यासाठी जिजाऊ माहेर डॉट कॉम नावाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. येथे आता एकाच क्लिकवर जिजाऊ माहेराची यशोगाथा उपलब्ध होणार आहे.राष्ट्रमाता जिजाऊ व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक आठवणींच्या खाणाखुणा आजही मातृतीर्थ सिंदखेडराजा परिसरात आढळून येतात. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरा त दूरदूरून पर्यटक येत असतात. राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य तसेच जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या पर्यटनस्थळाची माहिती पर्यटकांना क्षणात उपलब्ध होण्यासाठी जिजाऊ माहेर डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. याचबरोबर त्यांच्या स्पर्शाने पावन झालेले राज्यातील ऐतिहासिक किल्ले, गड, पुरातन वास्तू तसेच त्यांच्या शौर्याच्या पराक्रमाच्या गाथा, वॉलपेपर, जिजाऊ जन्मोत्सव-शिवजयंतीनिमित्त होणार्या विविध कार्यक्रमांची माहिती तसेच जिजाऊंच्या माहेराची संपूर्ण यशोगाथा संकेतस्थळावर मिळणार आहे. त्यामुळे जिजाऊ माहेर डॉट कॉम हे जिजाऊ व शिवरायांच्या भक्तांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. टेक्नॉलॉजीचे सीईओ प्रशांत फेपाळे व परमेश्वर भगवान मेहेत्रे हे संकेतस्थळाचा हा प्रकल्प राबवित आहेत.
आता एकाच क्लिकवर जिजाऊ माहेराची यशोगाथा
By admin | Updated: December 8, 2014 01:29 IST