चिखली (बुलडाणा): शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावरील मेहकर फाटा येथे राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात आलेला राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचा पुतळा नियमित साफसफाईअभावी रानगवत, रानझुडपे व धुळीच्या विळख्यात सापडला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुतळ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मातृतीर्थ बुलडाणा जिल्हय़ातच मा साहेबांच्या पुतळ्याची अशी दुरवस्था झाल्याने जिजाऊ भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्हावासीयांचा मानबिंदू, राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील तमाम शिवभक्तांचे आणि जिजाऊ भक्तांचे श्रद्धास्थान राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांचा अर्धाकृती पुतळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकारातून मेहकर फाट्यावर उभारण्यात आलेला आहे; मात्र हा पुतळा उभारून जबाबदारी संपल्याची जाणीव या विभागाकडून वारंवार करून देण्यात येत आहे.
जिजाऊ मा साहेबांच्या पुतळ्याची दुरवस्था
By admin | Updated: December 8, 2014 23:53 IST