शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजात १२ जानेवारी रोजी मॉ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा; लाखो जिजाऊ भक्तांची राहणार उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:32 IST

बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी रोजी राजमाता मॉ जिजाऊ यांचा ४२0 वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च जिजाऊ पुरस्कार यावर्षी सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीच्या रहिवासी लेप्टनंट स्वाती महाडीक यांना शुक्रवारी शिवधर्म पीठावर प्रदान करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे हे प्रमख आकर्षण राहणार आहे.

ठळक मुद्देदिवसभर कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी रोजी राजमाता मॉ जिजाऊ यांचा ४२0 वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च जिजाऊ पुरस्कार यावर्षी सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीच्या रहिवासी लेप्टनंट स्वाती महाडीक यांना शुक्रवारी शिवधर्म पीठावर प्रदान करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे हे प्रमख आकर्षण राहणार आहे.मराठा सेवा संघाच्यावतीने दरवर्षी सिंदखेड राजा नगरीत जिजाऊ सृष्टीवर हा उत्सव साजरा करण्यात येतो. ३ जानेवारीपासून या महोत्सवास सुरुवात होते. १२ जानेवारीला शिवधर्म पीठावर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या भाषणाने तथा आतषबाजी करून या जन्मोत्सवाचा समारोप होत असतो. त्यानुषंगाने १२ जानेवारीला सिंदखेड राजात दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, सूर्याेदयी मराठा सेवा संघ आणि त्यांच्या ३२ कक्षांतील प्रमुख जोडप्यांच्या हस्ते मासाहेब जिजाऊंची महापूजा करण्यात येईल. त्यानंतर वारकरी दिंडी सोहळा शिवभक्त परायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्या नेतृत्वात राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत निघेल. सकाळी आठ ते दहा वाजेदरम्यान जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. प्रारंभी आ. शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथील राजवाड्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, पूर्वसंध्येला राजवाड्यावरून मशाल यात्राही काढण्यात आली होती. यामध्ये मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व शहरातील महिला वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. सोबतच राजवाड्यासमोर दीपही प्रज्वलित करण्यात आले होते.दरम्यान, या महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सिंदखेड राजा नगरीत पोलिसांचा तगडा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती- या कार्यक्रमास छत्रपती तथा सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नगर परिषदेच्यावतीने आयोजित सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. - राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘माझी कन्या भाग्यश्री’ या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही सभा आम आदमी पार्टीच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता ही सभा होणार आहे.

टॅग्स :jijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा