शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जळगाव जामोद : श्री सखाराम महाराज पालखीचे पंढपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:49 IST

जळगाव जामोद :  टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.

ठळक मुद्देराजवैभवी थाटात इलोरा (सखारामपुर) येथून श्री सखाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू झाले. या पालखी सोहळ्यात १५० वारकरी सहभागी असून सोपानबुवा हे पालखीचे मुख्य चालक आहे. वारकरी मार्गस्थ होत असताना पंढरीच्या विठ्ठलाची ओढ भाविकांच्या  अंतकरणात दिसून येत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो स्त्री-पुरूष भाविकांनी वारकºयांचे दर्शन घेत ‘श्रीं’च्या पालखीला भक्तीभावाने निरोप दिला.यावेळी ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’, काय करावी साधने फल अवघेची देणे’ या अभंगांच्या गजराने  संपुर्ण आसमंत दुमदुमूला.  सर्वप्रथम संस्थानचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज व मलकापूर मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी श्री संत सखाराम महाराजांच्या मुर्तीचे व पालखीतील पादुकांचे पुजन केले. त्यानंतर बँड, पताका, घोडे, टाळकरी, विणेकरी, मृदंग वादक अशा राजवैभवी थाटात इलोरा (सखारामपुर) येथून श्री सखाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू झाले. विठ्ठल माझा माझा, मी विठ्ठलाचा’ या अभंगाने वारकरी मार्गस्थ होत असताना पंढरीच्या विठ्ठलाची ओढ भाविकांच्या  अंतकरणात दिसून येत होती.या पालखी समवेत श्री सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज, आ.चैनसुख संचेती, संस्थानचे व्यवस्थापक श्रीकृष्णदादा पाटील, भैय्याभाऊ बकाल, गजाननबापु देशमुख, नानासाहेब शित्रे पाटील, राजु ठाकरे, नितीन महाराज, संतोष महाराज, महादेव महाराज, बाबुराव पाटील, संतोष पाटील यांनी भास्तनपर्यंत पायीवारी केली. या पालखी सोहळ्यात १५० वारकरी सहभागी असून सोपानबुवा हे पालखीचे मुख्य चालक आहे. शुक्रवारी सकाळी ८ वा. इलोºयावरून या पालखीचे प्रस्थान झाले.

सव्वाशे वर्षाची परंपराबुलडाणा जिल्ह्यात सर्वात आधी पंढरीची पायीवारी करणारी ही पालखी समजली जाते. श्री संत सखाराम महाराजांनी स्वत:  तब्बल ६० वर्षे पंढरीची पायीवारी केली. तसेच त्यांनी बुलडाणा, अकोला, जळगाव खान्देश, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पायी फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. अशिक्षित असलेल्या सखाराम महाराजांना ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आदी सर्व ग्रंथ मुखोदगत होते. श्री संत सखाराम महाराजांनंतर पंढरीच्या पायीवारीची परंपरा गुरूवर्य श्रीराम महाराज (बोवासाहेब) यांनी कायम ठेवली.  सध्या संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज हिच परंपरा पुढे चालवित असल्याने या पंढरीच्या पायीवारीला सव्वाशे वर्षाचा इतिहास निर्माण झाला आहे.माऊलीची जी पायीवारी आळंदीवरून निघते त्यामध्ये तुकाराम महाराजांचा पंढरीची पायीवारी करतात. विशेष म्हणजे  पाच वर्षापुर्वी तुकाराम महाराजांनी आजारी असतांनाही वारीत खंड पडू दिला नाही. या माऊलीच्या वारीत श्री संत सखाराम महाराज संस्थानला विशेष स्थान असून एका फडावर हभप तुकाराम महाराज यांची किर्तनसेवा असते. यामुळे जळगाव तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या सर्व वारकºयांपर्यंत पोहचले आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद