शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद : मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात दोन शिवसेना नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 19:12 IST

Jangaon Jamod Shiv Sena Corporators गजानन वाघ आणि रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली.

ठळक मुद्देपोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विरोधकांनी ६ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकार्यांच्या कक्षामध्ये गदारोळ केला. 

जळगाव जामोद:  स्थानिक दुर्गा चौकांमध्ये असलेल्या नवीन कॉम्प्लेक्सच्या हर्राशी प्रकरणाची गुपचूप निविदा काढून मजीर्तील लोकांना विकण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी ६ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकार्यांच्या कक्षामध्ये गदारोळ केला.  यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गजानन वाघ आणि रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली.जळगाव नगरपरिषदेने दुर्गा चौकामध्ये भव्य असे व्यापारी संकुल बांधलेले आहे. सदर संकुलामध्ये अंदाजे २८ दुकाने आहेत. शहराच्या मध्यभागी असलेले हे कॉम्प्लेक्स आणि या मधील दुकाने घेण्यास गेल्या कित्येक दिवसापासून शहरवासी उत्सुक आहेत. परंतु अद्यापही त्याची हर्र्राशी झालेली नाही. गुरूवारी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन वाघ, अर्जुन घोलप, रमेश ताडे, संदीप मानकर, नितीन ढगे ,श्रीकृष्ण केदार, कलीम भाई यांच्यासह संजय भुजबळ, संतोष बोरसे, जहीर भाई यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला. तेव्हा सदर कॉम्प्लेक्सची छोटीसी निविदा काढून त्यासाठी मजीर्तील चार ते पाच लोकांनी निविदा भरल्या होत्या. परंतु सदर बाब विरोधकांच्या लक्षात आली. त्यामुळे मुख्याधिकारी कक्षात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी विचारणा केली. यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेचे गजानन वाघ आणी रमेश ताडे यांनी पेट्रोल अंगावर घेतले होते. परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर मुख्याधिकारी अशिष बोबडे यांनी विरोधी नगरसेवकांना लेखी आश्वासन दिले. त्याचबरोबर सदर लिलावाला मुदतवाढ देण्याबाबतचे पत्र दिल्याने वातावरण शांत झाले. 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदShiv Senaशिवसेना