शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील जातीच्या दाखल्यांचे प्रस्ताव पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:22 IST

संग्रामपूर: संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन्ही तालुक्यातील एक महिन्यापासून उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे  जातीचे व नॉनक्रिमिलेअर दाखल्यांचे सुमारे साडेचारशे प्रस्ताव प्रलंबित आहेत

संग्रामपूर: संग्रामपूरजळगाव जामोद या दोन्ही तालुक्यातील एक महिन्यापासून उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे  जातीचे व नॉनक्रिमिलेअर दाखल्यांचे सुमारे साडेचारशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यावर त्वरीत निर्णय घेण्यात न आल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध कामांसाठी जातीचा तसेच नॉन क्रिमीलेअर दाखला आवश्यक आहे. जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सेतूच्या माध्यमातून आॅनलाईन प्रस्ताव दाखल केले आहेत. कागदपत्राची पूर्तता करीत प्रस्ताव तहसील कार्यालय संग्रामपूर येथे गेले. तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव जळगाव जामोद येथे उपविभागीय कार्यालयात सादर करण्यात आले. परंतु प्रस्ताव सादर करून एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही उपविभागीय कार्यालयाकडून याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. यात संग्रामपूर तालुक्यातील दोनशेच्यावर प्रस्ताव आॅनलाइन सर्व्हरवर पडून आहेत. यावरून प्रस्तावाची पाहणी करून विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याकरिता अधिकºयांकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय कार्यालयाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश, स्कॉलरशिप, नोकरीसह विविध कामांसाठी दोन्ही दाखले आवश्यक आहेत. हे दाखले सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नसल्यांने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याची जाणीव असतांनादेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे. अनेक दिवसांपासून दाखल्यांसाठी तारीख पे तारीख मिळत आहे. नागरीकांचा वेळ व पैसा वाया वाया जाऊ नये, यासाठी आॅनलाईन प्रणाली अवलंबविण्यात आली असली, तरी महसूल अधिकारी व कर्मचाºयांच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देवून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरJalgaon Jamodजळगाव जामोद