शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

भारतीय जैन संघटना जलक्रांती निर्माण करणार - देशलहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:34 IST

देऊळगावराजा : संपूर्ण बुलडाणा कायम स्वरुपी दुष्काळमुक्त करण्याकरिता ‘सुजलाम सुफलाम’ हे ब्रिदवाक्य समोर ठेवत भारतीय जैन संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठे धरणातील गाळ काढणेकरिता शासकीय यंत्रणेला १00 जेसीबी व ३५ पोकलॅण्ड विना मोबदला उपलब्ध करून देणार आहे.

ठळक मुद्दे३ मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : संपूर्ण बुलडाणा कायम स्वरुपी दुष्काळमुक्त करण्याकरिता ‘सुजलाम सुफलाम’ हे ब्रिदवाक्य समोर ठेवत भारतीय जैन संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठे धरणातील गाळ काढणेकरिता शासकीय यंत्रणेला १00 जेसीबी व ३५ पोकलॅण्ड विना मोबदला उपलब्ध करून देणार आहे. जेसीबी जलयुक्तच्या या कामाला प्रत्यक्षात ३ मार्चपासून सुरुवात होणार असल्याची माहिती संघटनेचे मुख्य सचिव समन्वयक राजेश देशलहरा यांनी दिली.यावेळी आयोजित जैन समाज बांधवांच्या १२ फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य जयचंद बाठीया, शीतल गादिया उपस्थित होते. देशलहरा म्हणाले की, भारतीय जैन संघटनेद्वारे गेल्या ३0 वर्षांपासून राज्यासह संपूर्ण देशात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यापूर्वी भूकंप, नैसर्गिक आपत्तीमध्ये योगदान, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाच्या व्यवस्थेसह त्यांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे.गेल्या वर्षीपासून ‘जल है तो कल है’ प्रमाणे पाण्याची गरज ओळखून ठिकठिकाणी धरणातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तर यावर्षी संघटनेने संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली आहे. प्रथम टप्प्यात १00 जेसीबी व ३५ पोकलॅन्डद्वारे जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठय़ा धरणातील गाळ काढण्याचे निश्‍चित झाले आहे. मशिनरी संघटनेची तर इंधन शासनाचे,  असा करारनामा यापूर्वी करण्यात आला आहे.दे.राजा तालुक्यातील ज्या-ज्या धरणातील गाळ काढावयाचा आहे, त्याचे नियोजन शासकीय यंत्रणेने केले आहे. या कामाकरिता तालुक्याला १0 जेसीबी व २ पोकलॅन्ड मिळणार आहेत. गत दोन वर्षांपासून लोकसहभागातून शहरातील आमना नदीचा फार मोठय़ा प्रमाणात गाळ काढून पाण्याच्या पातळीत वाढ करणेस मदत झालेली आहे. शहरात आयोजित या सभेला राजेश देशलहरा, जयचंद बाठीया, शीतल गादिया, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन, तालुका अध्यक्ष मनिष कोठेकर, शहर अध्यक्ष निलय जिंतूरकर, राजेंद्र दुगड, कविश जिंतूरकर, नंदन दर्यापूरकर सह भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह सकल जैन समाजातील समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा