शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच, २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:45 IST

Corona Vaccination : याच गतीने लसीकरण होत राहिल्यास २०२२ संपेपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण झाले तरी मिळवले अशी स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेसोबतच दिलेल्या त्रिसूत्रीचे नागरिकांना आगामी काळातही पालन करावेच लागणार आहे. कारण लसीकरण मोहिमेचा वेग जिल्ह्यात मंद आहे. याच गतीने लसीकरण होत राहिल्यास २०२२ संपेपर्यंत जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण झाले तरी मिळवले अशी स्थिती आहे.दरम्यान, त्याउपरही जिल्हा प्रशासन लसीचे डोस मिळताच लसीकरणास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या ही २९ लाख  ६४ हजार  २२० च्या आसपास आहे.  २०११ च्या जनगणनेनुसार ती २५ लाखांच्या आसपास होती. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील २१ लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३७ हजार ९५५ जणांना लस दिली गेली आहे. ६० वर्षांवरील १ लाख ४४ हजार ६६२ जणांना लस दिली गेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार २५३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यातील ८७ हजार १०१ जणांना म्हणजे एकूण पात्र लोकसंख्येच्या ४.१४ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्डचे ३ लाख ३७ हजार ६६४ तर कोव्हॅक्सिनचे ८१ हजार ५३१ डोस मिळालेले आहेत. १ लाख ७८ हजार ६५६ पुरुष, तर १ लाख ५३ हजार ३८२ महिलांनी लस घेतली आहे. दुसरा डोस ४.१४ टक्के नागरिकांनी आतापर्यंत घेतला आहे.

१८ वर्षांवरील ४९ हजार ४२९ जणांनी घेतला डोसn१ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पण डोस उपलब्धतेची समस्या पाहता मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर या वयोगटातील लसीकरण लांबणीवर टाकले गेले. डोसची उपलब्धता नसताना केंद्राने याबाबत घोषणा का केली, असा प्रश्नही काहीजण विचारत आहेत. १८ वर्षांखालील मुलांचा अद्याप लसीकरणासाठी विचार करण्यात आलेला नाही. त्यातच तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने पालकवर्गही चिंतित आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात लसीकरणपात्र नागरिकांपैकी ०.५४ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले. तर मे महिन्यात ५.९१ टक्के नागरिकांचे ३० मे पर्यंत लसीकरण झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

१५ हजार जणांना लस देण्याची क्षमताआरोग्य विभागाची प्रतिदिन १५ हजार नागरिकांना लस देण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्जही आहे. आवश्यक सुविधा, शीतकरण यंत्रांची साखळीही उपलब्ध आहे. मात्र लसींचे डोस उपलब्ध होण्यात अडचणी आहे. लस उपलब्ध झाल्यास एक महिन्यात २ लाख ४० हजार नागरिकांचे लसीकरण गुणात्मक पद्धतीने करण्याची क्षमता आरोग्य विभागाची असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२६ केंद्र सुरूजिल्ह्यात सध्या २६ केंद्रांवर लसीकरण सुरू असून, यातील दोन केंद्र खासगी आहेत. प्रारंभी जिल्ह्यात १०२ लसीकरण केंद्र होते. त्यानंतर लस पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण पाहता टप्प्याटप्प्याने केंद्र कमी झाले. आता सध्या २६ केंद्र सुरू आहेत. प्रशासनाची लस उपलब्ध झाल्यास पूर्ण लसीकरण करण्याची क्षमता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणा