शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून शिवसेना महिला नगरसेविका आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर :  शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका आक्रमक झाल्या आहेत. या विषयावर लाखोचा खर्च करण्यात येतो. प्रत्यक्षात घाण कायम असल्याचा आरोप करून तिन्ही नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यां ची भेट घेणार असल्याची माहिती असून, त्यांच्या प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती मिना मुकेश लालवाणी यांनी मंगळवारी कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची झाडाझडती ...

ठळक मुद्देमहिला व बालकल्याण सभापती मिना मुकेश लालवाणी यांनी मंगळवारी कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची झाडाझडती घेतल्याने एकच खळबळ उडाली.मिना संचेती, राधिका किशोर नवले, ज्योती राजु कुलोकर यांनी आक्रमक पवित्रा घेवून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर :  शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका आक्रमक झाल्या आहेत. या विषयावर लाखोचा खर्च करण्यात येतो. प्रत्यक्षात घाण कायम असल्याचा आरोप करून तिन्ही नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यां ची भेट घेणार असल्याची माहिती असून, त्यांच्या प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती मिना मुकेश लालवाणी यांनी मंगळवारी कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची झाडाझडती घेतल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील कचरा व्यवस्थापनात पालिका प्रशासनाच्यावतीने महिन्याकाठी लाखो रूपयांची देयके अदा केली जात आहे. सदर ट्रॅक्टरच्या ट्रिप कमी होवूनही रेकॉर्डवर जादा दाखवून लाखो रूपयांची बिले काढण्यात येत असून मलकापुरातील शिवसेनेच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती मिना संचेती, राधिका किशोर नवले, ज्योती राजु कुलोकर यांनी आक्रमक पवित्रा घेवून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. मंगळवारी सकाळीच महिला बालकल्याण सभापती मिना ललवाणी ह्या जातीने रस्त्यावर उतरल्या त्यांनी बिर्ला रोड, रामदेवबाबा नगर या परिसरात कचºयाची वाहतूक करणाºया ट्रॅक्टरची झाडाझडती घेतली. त्यांच्याजवळील कागदपत्रे त्यांनी तपासली असता लायसन्स, आरसी बुक, शेरेबुक अनेकांजवळ आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी आरोग्य सभापती अ‍ॅड.जावेद कुरेशी यांना तात्काळ बोलावून हा प्रकार त्यांना अवगत करून दिला.दरम्यान शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून शिवसेनेच्या नगरसेविका आक्रमक झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून   कचºयाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावNagar Bhavanनगरभवन