शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांसाठी 'आधार सिडिंग'चा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:15 IST

Ration Cards News अपात्र आणि बोगस शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्यासाठी पुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : पाच महिन्यांपेक्षा जास्त अधिक कालावधीपासून धान्य उचल न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या आधार सिडिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेरीस पाच लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका बाद होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपात्र आणि बोगस शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्यासाठी पुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.ऑगस्ट ते डिसेंबर महिन्याच्या या पाच महिन्यांच्या कालावधीत  राज्यातील सात लक्ष ९५ हजार १६८ शिधापत्रिकांवर एकदाही धान्याची उचल करण्यात आली नाही. अशा शिधापत्रिकांची जिल्हानिहाय तपासणी केली जात आहे. दरम्यान, गत पाच महिन्यांत एकदाही धान्य  न घेणाऱ्या मात्र, यापुढे धान्य घेण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांच्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी, पडताळणी आणि आधार सिडिंग केली जाणार आहे. त्यानंतरच १४ फेब्रुवारी, २०२१ नंतर या शिधापत्रिका उचित योजनेत वर्ग केल्या जातील.

बुलडाणा जिल्ह्यात १८ हजार शिधापत्रिका! बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १८ हजार १४३ शिधापत्रिकांवर गत पाच महिन्यांत धान्याची उचल करण्यात आलेली नाही. या शिधापत्रिकाधारकांच्या आधार सिडिंगचा मुद्दा चव्हाट्यावर आल्याने, अनेकांनी स्वत:हून धान्य उचल केली नसल्याचे समोर आले आहे. 

अनेकांची नावे दोन शिधापत्रिकेत! सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतील अनियमिततेला आळा घालण्यासाठी शासनाने शिधापत्रिका संगणकीकृत केल्या आहेत. या शिधापत्रिकांसाठी आधार सिडिंग अनिवार्य केले आहे. दोन शिधापत्रिकांमध्ये नाव असलेल्यांचे धान्य वितरण आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य गळतीला आळा बसण्याचे संकेत आहेत. 

धान्य घेण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. शिधापत्रिकेसाठी कुठेही आधार सिडिंग केलेले नसेल,  तरच त्यांची नावे नवीन शिधापत्रिकेसाठी ग्राह्य धरल्या जातील. कुणावरही अन्याय होणार नाही, याचीही योग्य ती खबरदारी घेतली जाईल.- व्ही. एम. व्हनमाने पुरवठा निरीक्षक, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगाव