रफीक कुरेशी/मेहकर (बुलडाणा)शेतीसाठी पाण्याचा काटकसरीने उपयोग होऊन जास्तीत-जास्त क्षेत्र ओलिताखाली यावे, याकरिता शासनाच्यावतीने ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना राबविण्यात येते; परंतु तालुक्यात या सिंचन योजनेचे २ कोटी ७५ लाख रुपये अनुदान गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडे दिसून येत आहे. सिंचन अनुदानासाठी तालुक्या तील सुमारे १ हजार ७00 शेतकर्यांना कृषी विभागाच्या पायर्या झिजवाव्या लागत आहे त. शेतीचे सिंचन होऊन कमी पाण्यात भरघोस उत्पन्न शेतकर्यांना घेता यावे या हेतूने शासनाच्यावतीने सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे. सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक संच खरेदी करताना पीकनिहाय अनुदान आणि खर्च पुरवल्या जातो. तर तुषार संच खरेदीसाठी अल्पभूधारक शेतकर्यांना १४ हजार रुपये अनुदान देण्यात येते. योजनेअंतर्गत भूधारकांना ९ हजार ५00 रुपये अनुदान मिळत होते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून निधी उ पलब्ध न झाल्याने तालुक्यातील सुमारे १ हजार ७00 शेतकर्यांचे २ कोटी ७५ लाख रुपये थकले आहेत. यासंदर्भात कृषी विभागाला मागील शेतकर्यांचे अनुदान न मिळाल्याचे कारण विचारले असता, बजेटमध्ये तरतूद नसल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे शे तकर्यांचे सिंचन योजना अनुदानाचे नवीन प्रस्तावही स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. परिणामी २0१४-१५ साठी शेतकर्यांना ठिबक आणि तुषार संच खरेदी करता येणार नाहीत. शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शे तकर्यांमधून होत आहे. मेहकर तालुक्यातील १७00 शेतकर्यांची दोन कोटी ७५ लाख रुपयांची मागणी वरिष्ठ अधिकार्यांकडे करण्यात आली असल्याचे तालुका कृषी अधिकारी एम.पी. काळे यांनी सांगीतले.
सिंचन योजना अनुदानाचे भिजत घोंगडे
By admin | Updated: October 25, 2014 23:51 IST