शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

सिंचन घोटाळा: जिगाव प्रकल्पाची चौकशी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:07 IST

चार प्रकल्पांमध्ये झालेल्या अनियमितता व गैरप्रकारांची चौकशी मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असल्याचे सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सिंचन घोटाळ््यातंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील पाच प्रकल्पांच्या कामासंदर्भात सुरू असलेल्या उघड चौकशीपैकी एकमेव नांदुरा तालुक्यातील लोणवडी प्रकल्पाची चौकशी नस्तीबंद करण्यात आली असून अन्य चार प्रकल्पांमध्ये झालेल्या अनियमितता व गैरप्रकारांची चौकशी मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असल्याचे सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे. प्रामुख्याने जिगाव, खडकपूर्णा, पेनटाकळी आणि लोणार तालुक्यातील हिरडव या लघु प्रकल्पाचा यात समावेश आहे.दुसरीकडे जिगाव प्रकल्पाशी संबधीत एका प्रकरणात चौकशी पूर्ण करून दोषारोपत्र दाखल करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे गेल्यावर्षीच परवानगी मागण्यात आलेली दौषारोपपत्रातील नावे उलटी वाढविण्यात आली असून ती सख्या आठ वरून दहावर गेली आहे. दरम्यान, पेनटाकळी, खडकपूर्णा, हिरडव (लोणार) आणि नांदुरा तालुक्यातील लोणवडी या चार प्रकल्पांच्या कामाचीही चौकशी गेल्याच वेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्यावर्षीच सुरू केली होती. त्यातील नऊ कोटी २९ लाख ६८१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामासंदर्भातील उघड चौकशी ही गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. या लघु प्रकल्पाशी संबधीत दोन निविदांवर प्रामुख्याने उघड चौकशी करण्यात आली होती. त्यात काही न आढळ््यामुळे ती बंद करण्यात आली असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.जिगाव प्रकल्पासंदर्भातील चौकशी ही २०१४ पासून सुरू असून एका निविदा प्रकरणात कंत्राटदाराचे अनुभव प्रमाणपत्र बनावट असल्याचे जवळपास निश्चित झालेले असून त्यासंदर्भाने गुन्ह्याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केला असून प्रकरणात कथितस्तरावरील आरोपींची संख्या ही आठ वरून दहावर पोहोचली आहे. प्रकल्पाची वाढती किंमत, पुनर्वसन, जमीन अधिग्रहणाला प्राधान्य न देणे यासह तत्सम प्रकरणात ही चौकशी करून दोषारोपत्र दाखल करण्याची परवानगी मागण्यात आलेली आहे. जिगाव प्रकल्पांतर्गतच ५ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकल्पाचे काम मिळवून देण्यासाठी कंत्राटदारास बनावट प्रमाणपत्र मिळवून दिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खामगाव पोलीस ठाण्यात सात अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. काम मिळवून देण्यासाठी अभियंत्यांनीच बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. ५ वर्षांच्या आर्थिक उलाढालीची सरासरी न घेताच बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रमाणपत्र दिले गेले होते.

‘लोणवडी’च्या दोन निविदांचीही चौकशी बंदअमरावती विभागातील २५ प्रकल्पांची २३ जानेवारी २०१८ पासून चौकशी सुरू होती. त्यासाठी विशेष तपास (एसआयटी) पथकही गठीत करण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, खडकपूर्णा, हिरडव (लोणार) आणि लोणवडी प्रकल्पांच्या कामाची माहिती घेण्यात येत आहे. निविदा व इतर गैरप्रकाराबाबत कागदपत्रे गोळा करण्याचे काम या पथकाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नांदुरा तालुक्यातील लोणवडी या लघु प्रकल्पाची चौकशी पूर्ण झाली असून दोन निविदांची प्रामुख्याने तपासणी करण्यात आली. त्यात काही गैरप्रकार तथा अनियमितता न आढळल्याने लोणवडी प्रकल्पाची चौकशी बंद करण्यात आली असलाचे सुत्रांनी सांगितले.४१६ निविदांची चौकशीखडकपूर्णा प्रकल्पाचीही सध्या चौकशी सुरू असून एकूण ४१७ निविदा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपासण्यात येत होत्या. त्यातील एका निवेदेची चौकशी पूर्ण झाली होती. त्यात काही न आढळल्यामुळे केवळ या एका निविदेपूरतेची चौकशी बंद करण्यात आली आहे. अन्य ४१६ निविदांच्या चौकशी सुरू आहे. मात्र प्रकल्प १५ वर्षापेक्षा अधिक जुना असल्याने त्यासंदर्भातील कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे त्यांची तपासणी व व्हेरीफिकेशन करण्यास विलंब लागत असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे. अशीच स्थिती पेनटाकळी प्रकल्पाचीही आहे. निविदांचीही माहिती मिळण्यात विलंब होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प