शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

 रेशन धान्य वाहतुकीत अनियमितता; जिल्हा पुरवठा अधिकारी सक्तीच्या रजेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 17:57 IST

खामगाव: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत धान्य वाहतुकीत अनियमिततेबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे दोषी आढळून आल्याने, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची कारवाई विभागीय आयुक्तांनी केली आहे.

ठळक मुद्देअनियमितता आणि भ्रष्टाचार सर्वप्रथम ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता.बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतुकीतील भ्रष्टाचाराची  लक्तरे मंत्रालय स्तरावर यापूर्वीच पोहोचली आहेत.रेशन धान्य घोटाळ्याची मंत्रालय स्तरावरून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

- अनिल गवई खामगाव: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत धान्य वाहतुकीत अनियमिततेबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे दोषी आढळून आल्याने, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची कारवाई विभागीय आयुक्तांनी केली आहे. या आदेशामुळे जिल्हा पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली असून, बुलडाणा जिल्ह्यातील रेशन धान्य वाहतुकीतील अनियमितता आणि भ्रष्टाचार सर्वप्रथम ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. हे येथे उल्लेखनिय! बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतुकीतील भ्रष्टाचाराची  लक्तरे मंत्रालय स्तरावर यापूर्वीच पोहोचली आहेत. त्यामुळे रेशन धान्य घोटाळ्याची मंत्रालय स्तरावरून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. तथापि, जिल्ह्यात विविध ठिकाणी उघडकीस आलेल्या रेशन धान्य वाहतुकीतील अफरातफर प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणातील याप्रकरणी विविध ७ चौकशी प्रलंबित आहेत.  मंत्रालय स्तरावरील चौकशीही थंडबस्त्यात सापडली असताना, आता विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी २० जुलै रोजी एक तडकाफडकी आदेश पारीत करून जिल्हा पुरवठा अधिकारी बि.यु.काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पुरवठा विभागातील कनिष्ठ अधिकारी आणि पुरवठा प्रतिनिधींचे धाबे दणाणले आहे.धान्य वाहतुकीत अनियमिततेप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाºयांचा बळी गेला असला तरी, अद्याप या वाहतुकीला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर अद्याप कोणतीही कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कंत्राटदाराला वरिष्ठांकडून  झुकते माप दिल्या जात असल्याची ओरड होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची  कंत्राटदाराकडून अनेकदा पायमल्ली करण्यात आल्याचे विविध प्रकार जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. यासंदर्भात विविध चौकशीही करण्यात येत आहेत. मात्र, असतानाही वरिष्ठ अधिकाºयांकडून या कंत्राटदाराला पाठीशी घातल्या जात असल्याचा सूर दबक्या आवाजात आता जिल्हा पुरवठा विभागात उमटू लागला आहे. 

 

जिल्हास्तरीय चौकशी प्रलंबित!जिल्ह्यातील रेशन धान्याच्या अफरातफर प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तब्बल सात चौकशी प्रलंबित आहेत. तर एक चौकशी खासदारांच्या स्तरावर रखडल्याचे समजते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर चौकशींस विलंब झाल्याने जिल्ह्यातील रेशन धान्याच्या काळ्याबाजार पोफावला असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

जिल्हाधिकाºयांच्या अहवालावरून कारवाई!धान्य वाहतुकीतील अनियमिततेबाबत जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांनी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करून गंभीर ताशेरे ओढण्यात आले. या अहवालावरून विभागीय आयुक्तांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांवर कारवाई केली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा