शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आयपीएलच्या जुगाराचे जाळे

By अनिल गवई | Updated: April 24, 2023 17:41 IST

पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : जलंब पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आयपीएल जुगाराच्या कारवाईची शाई वाळते ना वाळते तोच, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीतील आयपीएलच्या जुगारावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. वडजी भेंडी येथील कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहर आणि परिसरात आयपीएलच्या जुगाराचे जाळे विणले गेल्याचे चित्र आहे.

याबाबत पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडजी भेंडी शेत शिवारातील एका शेतात रामसिंग विलास पवार ३२ रा. वडजी भेंडी, अजय किसनदास बौरागी २१ रा. घाटपुरी नाका खामगाव, अक्षय गणेश जुनारे २४ रा. गोपालनगर खामगाव हे तिघे आयपीएलच्या सामन्यावर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता तिन्ही आरोपी आयपीएल सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळताना आढळून आले. आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीचे सहा मोबाइल, ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटाप, दुचाकी, पेन ड्राईव्ह आणि १५५० रुपये रोख रक्कमेसह १ लाख २२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ अन्वये कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल जंजाळ यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.बुकींचे ग्रामीण भागात बस्तान

गत आठवड्यात जलंब पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारवाईनंतर रविवारी रात्री वडजी भेंडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. या दोन्ही कारवाईत खामगाव शहरासह नांदुरा शहरातील आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे खामगाव आणि नांदुरा शहरातील बुकींनी सुरक्षित ठिकाण म्हणून ग्रामीण भागात बस्तान बसविल्याची चर्चा आहे.

चक्री जुगार दुर्लक्षित

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोेलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात दोन चक्री जुगार सुरू आहेत. या चक्री जुगाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात एखादे वेळी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी