शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैर कारभाराची चौकशी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:10 IST

समयबद्ध कालावधीत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खामगाव शहर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या उद्देशाने केलेल्या गैर कारभार प्रकरणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेमार्फत महाराष्ट्र कृषी उत्पन्न नियम क्रमांक १०७ व १०८ या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराची ४०(ई) नियमातंर्गत समयबद्ध कालावधीत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खामगाव शहर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. यासंदर्भात पालकमंत्र्यांना २५ जानेवारी निवेदन सादर करण्यात आले.खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती संतोष ताले यांनी भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साडेपाच लाख रुपये स्वत:च्या नावावर उचलून गैरप्रकार केला. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांनी सभापती ताले यांना नोटीस देत पैशांचा भरणा करण्यासाठी नोटीस बजावली. मात्र तरी देखील सभापती ताले यांनी अग्रिम रक्कमेची उचल कशासाठी केली. याचा कोणताही हिशोब व खर्चाचे व्हाऊचर अद्यापपर्यंत सादर केले नाही. महाराष्ट्र कृषी उत्पन्न नियमन नियम क्र.१०७ प्रमाणे सभापतींनी रक्कम आठवड्यातून दोनवेळा बँकेत टाकली पाहीजे. नियमाप्रमाणे अग्रीम रक्कम देण्याची कोणतीही तरतूद नाही. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय सभापतीला कोणताही खर्च करता येत नाही. दरम्यान, असे असतानाही सभापतींनी आपल्या पदाचा दुरूपयोग करीत अनधिकृतरित्या रोख स्वरूपात अ‍ॅडव्हास उचलला. नोटीस मिळाल्यानंतर देखील अद्यापपर्यंत सभापतींनी अग्रिम रक्कम बाजार समितीकडे जमा न केली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांचे उल्लघंन झाले. त्यामुळे ४० (ई) अंतर्गत सभापती संतोष ताले यांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.संतोष टाले यांनी काँग्रेससमधून गेल्या महिन्यातच भाजपात प्रवेश घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष टाले यांच्याबाबतीत संचालक मंडळात मतभेद सुरू आहेत.त्वरीत कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश!खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचाराच्या उद्देशाने करण्यात आलेल्या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करावी, असे निर्देश पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधकांना दिले आहेत.

 

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती