शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक जोरात!

By admin | Updated: April 3, 2017 03:16 IST

महसूल विभागाची मूकसंमती; दुस-या जिल्हय़ातही जाते रेती

उद्धव फंगाळमेहकर, दि. २- तालुक्यासह परिसरात तसेच दुसर्‍या जिल्ह्यामध्ये मेहकरवरून रेतीची अवैध वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीमुळे शासनाचा दरमहा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. मेहकर महसूल विभागाच्या मूकसंमतीमुळे हा प्रकार सर्रासपणे सुरू असून, अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याची चर्चाही गावात आहे. सध्या मेहकरसह डोणगाव, जानेफळ, सुलतानपूर आदी ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. ज्या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असेल, त्या परिसरात सध्यातरी बांधकाम करू नये, अशा सूचना असतानाही बांधकाम मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. अशा बांधकामांना रेती पुरवठय़ाचा धंदा मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. टाटा-४0७, मोठे टिप्पर यामधून रेतीची वाहतूक सुरू आहे. लोणार तथा मंठा हद्दीतून ही रेती आणल्या जात आहे. रेती वाहतुकीची १ ते २ ब्रासची रॉयल्टी काढून त्याआधारे जास्त ब्रासची वाहतूक सुरू आहे. हा सर्व प्रकार मेहकरचे महसूल विभागाचे संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून दिवसाढवळ्या सुरू आहे. रेती वाहतूक करणारे नियमांचे उल्लंघन करून रेतीची वाहतूक करीत असल्याने कारवाईच्या भीतीपोटी रस्त्यावरून आपली वाहने बेधुंद अवस्थेत व वेगाने चालवतात. त्यामुळे अनेक वेळा अपघातही झालेले आहेत; मात्र संबंधित विभाग व रेती वाहतूकदार यांच्या संमतीने हा सर्व प्रकार सुरू असल्याने कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर एक ते दोन महिन्यातून थातूरमातूर कारवाई करून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येत आहे; परंतु सध्या मेहकर, डोणगाव, जानेफळ, सुलतानपूरसह मालेगाव, वाशिम, आदी ठिकाणी मेहकरवरूनच रेतीची अवैध वाहतूक करणे सुरू आहे. रेतीच्या या अवैध वाहतुकीतून दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होत असते; मात्र यापैकी महसूलच्या खात्यात किती रक्कम जमा होते, का केवळ कागदी घोडे नाचवणे सुरू आहे. संबंधित अधिकारी तथा रेती वाहतूकदार यांच्या या प्रकारामुळे शासनाचा दरमहा लाखो रुपये महसूल बुडत आहे. तरी संबंधित अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन शासनाच्या नियमांचे पालन करून ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.गिट्टी वाहतूक करणारे वाहन पकडलेगिट्टीची वाहतूक करणारे वाहन पकडून तहसीलला जमा करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तहसीलदार संतोष काकडे यांनी सोनाटी बायपासवरून गिट्टीची वाहतूक करणारे वाहन पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे.