शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

इच्छुक उमेदवारांमध्ये ‘ऑनलाइन’ची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:09 IST

जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या २७९ ग्राम पंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज १५ ते २२ स प्टेंबरदरम्यान ऑनलाइन सादर करावे लागणार आहेत.  नामनिर्देशन सादर करण्याच्या कालावधीत एक सार्वजनीक  सुटी येत असल्याने केवळ सातच दिवस अर्ज भरण्यासाठी  मिळणार आहेत, त्यात ऑनलाइनच्या वाढत्या तांत्रिक  अडचणींमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नामांकन योग्य पद्धतीने  व वेळेवर सादर होणार की नाही, याची भीती वाढत आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूकनामनिर्देशनासाठी सात दिवसांचा कालावधी 

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या २७९ ग्राम पंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज १५ ते २२ स प्टेंबरदरम्यान ऑनलाइन सादर करावे लागणार आहेत.  नामनिर्देशन सादर करण्याच्या कालावधीत एक सार्वजनीक  सुटी येत असल्याने केवळ सातच दिवस अर्ज भरण्यासाठी  मिळणार आहेत, त्यात ऑनलाइनच्या वाढत्या तांत्रिक  अडचणींमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नामांकन योग्य पद्धतीने  व वेळेवर सादर होणार की नाही, याची भीती वाढत आहे.कर्जमाफीचे अर्ज भरताना ऑनलाइन प्रणालीचा अत्यंत  वाईट अनुभव शेतकर्‍यांना आला. तांत्रिक अडचणीमुळे   अनेकांचे ऑनलाइन अर्ज भरणे बाकी आहे. त्यामुळे आता  ग्रामीण भागात ऑनलाइन अर्ज म्हटले की, लोक नाक मुरड त आहेत; परंतु ग्रामीण भागातील राजकारणाचा केंद्रबिंदू  समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांना  आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन सादर करावा लागणार  आहे. जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ ऑ क्टोबर रोजी होणार आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील ५0  ग्रामपंचायत, बुलडाणा तालुक्यात १२, मलकापूर ११, मो ताळा ११, नांदुरा १३, खामगाव १३, शेगाव १0, जळगाव  जामोद १९, संग्रामपूर २१, चिखली २८, देऊळगाव राजा १९  व लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत  आहेत. त्यासाठी १५ ते २२ सप्टेंबरदरम्यान सकाळी ११ ते दु पारी ४.३0 वाजेदरम्यान नामांकन अर्ज भरता येणार आहेत;  परंतु अर्ज भरण्याच्या कलावधीमध्ये १७ सप्टेंबरला  रविवारची सार्वजनिक सुटी  येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या इच्छुक उमेदवारांच्या हातात  १५ स प्टेंबरपासून केवळ सातच दिवस  अर्ज भरण्यासाठी उरत  आहेत. या सहा दिवसात अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची सं ख्या व त्यासाठी लागणारा वेळ, संकेतस्थळ हँग  होणे, लिंक  फेल, सर्व्हरची अडचण, विद्युत पुरवठय़ाचा लपंडाव  यासारख्या वाढत्या तांत्रिक अडचणींमुळे इच्छुक  उमेदवारांमध्ये नामांकन योग्य पद्धतीने व वेळेवर सादर होणार  की नाही, याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुक  उमेदवारानी आतापसूनच अर्ज भरण्याची तयारी पूर्ण करत  आहेत. 

प्रमाणपत्रांच्या जुळवाजुळवसाठी उमेदवारांची धावपळग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारीसाठी वेळेवर अर्ज  भरले जावे, याकरिता इच्छुक उमेदवारांची आवश्यक कागद पत्रे व प्रमाणपत्रांच्या जुळवाजुळसाठी धावपळ सुरू आहे.  नामांकन अर्जाबरोबर शौचालय वापरत असल्याचे प्रमाण पत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, ग्रामपंचायत कराची थकबाकी  नसल्याचे किंवा ग्रामपंचायतचा पूर्ण कर भरल्याची पावती,  ितसरे अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र हे कागदपत्रे जोडावी  लागणार आहे. तसेच राखीव जागेतून उमेदवारी अर्ज दाखल  भरणार्‍या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी  प्रमाणपत्र वा जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर  केल्याची पावती जोडावी लागणार आहे. त्यामुळे कागदपत्रे  जमविण्याची लगबग इच्छुक उमेदवारांमध्ये सुरू आहे. 

पहिल्या दिवशीच होणार अर्ज भरण्यासाठी गर्दीग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुद तीच्या शेवटच्या दिवसांमध्ये इच्छुक उमेदवार अर्ज भरतात;  परंतु आता ऑनलाइन प्रणालीमध्ये वाढलेल्या तांत्रिक  अडचणींमुळे व अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी  असल्याने पहिल्या व दुसर्‍याच दिवशी ऑनलाइन केंद्रावर  इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे.  तांत्रिक अडचणींमुळे आपला अर्ज भरण्याचा बाकी राहणार  नाही, यासाठी पहिल्या दोन दिवसातच अर्ज भरला जावा,  याची सर्व तयार ग्रा.पं.च्या इच्छुक उमेदवारांनी केली आहे.