शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

जळगाव जामोद येथे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:07 IST

जळगाव जामोद : स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे शारीरिक शिक्षण विभागाकडून अमरावती विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ५ ते ७ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. 

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग राज्य स्तरावर खेळण्याची संधी 

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे शारीरिक शिक्षण विभागाकडून अमरावती विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ५ ते ७ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. यामध्ये यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलडाणा व अकोला या पाच जिल्ह्यांच्या एकूण १५0 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.हा खेळ प्रकार जळगाव जामोद नगरीमध्ये तिसर्‍यांदा आयोजित करण्यात आला होता. धनुर्विद्या या खेळ प्रकारात तीन विभागात सामने खेळविले जातात. इंडियन, रिकर्व्ह व कम्पाउंड या सामन्यांचे विशेष आकर्षण म्हणजे रिकर्व्ह या खेळात आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार शेळके, प्रवीण जाधव व सुखमणी बारबेकर हे तिघेही पदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. इंडियन राउंड या खेळ प्रकारात गिरीश कुकडे के.एल. कॉलेज अमरावती यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याला ६२८ गुण मिळाले. विवेक बोथीकर वाशिम हा ६२७ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आला. रोशन सोळंके नांदगाव एकूण ६२३ गुणांसह तिसर्‍या स्थानी यश संपादन केले. महिला विभागात दामिनी बोरो हिने ५९९ गुण मिळवत पहिला क्रमांक मिळविला. मालविका पाल अमरावती हिने ५३९ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला. दुर्गा लांडकर शिरपूर जैन हिने ४८२ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. रिकर्व्ह धनुर्विद्या या खेळाडूंनी त्यांच्या खेळाला साजेसा खेळ करताना ७0 मीटर अंतरावरून खेळताना ६५0 गुण मिळवत तुषार शेळके याने प्रथम क्रमांक मिळविला. प्रवीण जाधवने ६४३ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला, तर सुखमणी बारबेकर याने ६३४ गुण मिळविले व तिसरे स्थान प्राप्त केले. मुलींमध्ये उन्नती राऊत बडनेरा हिने ५८८ गुण प्राप्त करत सुवर्णपदक मिळविले. प्राजक्ता कांटे हिने ४३१ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. अवंती काळकोंडे हिने ४१३ गुण मिळवत तिसरे स्थान मिळविले. कंपाउंड राउंड या खेळ प्रकारात पुरुष विभागात श्रीरंग सावरकर कारंजा लाड याने ६५0 गुण मिळवत अग्रस्थानी होता. द्वितीय स्थानावर सचिन पांथीने ५३३ गुण प्राप्त केले. खम्पा बासुमतारी याने ४0७ गुण घेऊन कांस्य पदकाचा मानकरी ठरला. मुलींच्या बाजूने श्‍वेता कोल्हे ६५८ गुण मिळवित प्रथम आली. रुचा देशमुख ६३७ दुसर्‍या क्रमांकावर आली, तर अनुजा महालक्ष्मे हिने ५९७ गुणांची कमाई केली व तिसर्‍या स्थानावर आली. सर्वच विजेत्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Sportsक्रीडाbuldhana jilha krida sankulबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल