शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

द्विसदस्यीय केंद्रीय समितीकडून कोविड रूग्णालयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 18:52 IST

Inspection of Covid Hospital केंद्र शासनाचे दोन सदस्यीय पथक ८ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: द्विसदस्यीय केंद्रीय पथकाने सोमवारी खामगाव येथील कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच आॅक्सीजन पुरवठ्याचीही चाचपणी या पथकाने केलीबुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या रूग्णसंख्येबाबत कारणीमिमांसा करण्यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाचे दोन सदस्यीय पथक ८ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे. यामध्ये केंद्रीय पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा, भुवनेश्वर आयुर्विज्ञान संस्थानमधील भूलतज्ज्ञ आंतर वैद्यकीय विभागातील सहा. प्राध्यापक डॉ. दृष्टी सुंदरदास यांचा समावेश आहे.  केंद्रीय द्विसदस्यीय पथक सोमवारी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड रूग्णालयात धडकले. रूग्णालयातील बेड, आॅक्सीजन आणि कोविड टेस्टींग लॅबचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार डॉ. शीतलकुमार रसाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे,  वैद्यकीय अधिक्षक सुरेश वानखडे, मुख्याधिकारी मनोहर अकोटकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी दिनकर खिरोडकर, डॉ. शैलेश खंडारे आदी उपस्थित होते.

 लसीकरणाची घेतली माहिती- केंद्रीय पथकातील सदस्यांनी कोविड संसर्ग परिस्थिती, कोरोना मृत्यू दर, पॉझिटिव्हीटी दर, दररोज होत असलेल्या तपासण्या, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आदिंची माहिती घेतली. कोविड नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाºयांना दिल्या. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी कोविड लसीकरणाचीही माहिती घेतली. लसीकरण सेंटरवरील सुविधा, कोविड रूग्णालयातील बेड, आॅक्सीजन बेड, आयसीयू युनीट, व्हेंटिलेटर आदींचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

 कोविड टेस्टींग लॅबबाबत व्यक्त केले समाधान!- खामगाव सारख्या तालुका स्तरावरील उपजिल्हा रूग्णालयात दातृत्वातून कोविड टेस्टिंग लॅबची उभारणी करण्यात आली आहे.  तालुका स्तरावर कुठेच कोविड टेस्टिंग लॅब कार्यान्वित नसल्याचे अधोरेखीत करीत, खामगाव येथील कोविड टेस्टिंग लॅब  आणि येथील सुविधांबाबत समितीने समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस