बुलडाणा : इपिलिप्सी या आजाराकडे ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धेने बघितले जाते. त्यामुळे सदर रुग्णावर वैद्यकीय उपचार न होता भोंदूबाबा व तांत्रिक-मांत्रिकाकडे उपचार केले जातात. अशा प्रकारच्या अंधश्रद्धायुक्त उपचारामुळे रुग्णाचा आजार बरा न होता अधिक बळावतो. तरी रुग्णांच्या नातेवाइकांनी अंधश्रद्धायुक्त उपचार दूर सारून आरोग्य सेवेच्या विविध उपचार प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकोला येथील आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी केले.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व डॉ. सूर्या इपिलिप्सी फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आज १४ सप्टेंबर रोजी इपिलिप्सी (मिरगी/फीट) या आजारावर तपासणी व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे तर प्रमुख पाहुण म्हणून डॉ. सूर्या इपिलिप्सी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या उपस्थित होते. ४९८ रुग्णांची तपासणी व औषधोपचारइपिलिप्सी शिबिरासाठी रुग्णांनी सकाळपासून मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. या रुग्णांची त पासणी डॉ. सूर्या इपिलिप्सी फाऊंडेशन मुंबईचे जवळपास ४0 वैद्यकीय अधिकारी करीत होते. त्या पैकी इपिलीप्सी (मिरगी व फीट) असलेल्या ४९८ रुग्णांची तपासणी त्यांना ईईजी सिटी स्कॅन, ओषधे देण्यात आली आहेत.
इपिलिप्सी निदान शिबिरात ४९८ रुग्णांची तपासणी
By admin | Updated: September 15, 2014 00:50 IST