शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

बुलडाणा जिल्ह्यातील धोकादायक ठरणाऱ्या १८६ माती तलावांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:43 IST

Buldhana News १८६ माती तलावांची तपासणी करण्यात येऊन यातील ६२ माती तलावांची प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रसंगी धोकादायक ठरू पाहणाऱ्या जिल्ह्यातील  १८६ माती तलावांची तपासणी करण्यात येऊन यातील ६२ माती तलावांची प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी २६ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कार्यालयामार्फत शासनस्तरावर मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेंतर्गतच्या तलावांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भाने उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली आहे. धोरणात्मक निर्णयांतर्गत राज्यातील जुन्या तलवांची देखभाल दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने मधल्या काळात जिल्हा परिषदेच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील (ल.पा.) पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, माती तलाव, सिंचन तलावांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी करण्यात आली होती. काही तलावांवर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली, तर काही तलावाच्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता तेथे दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच काही ठिकाणी तलावाची भिंतही दबली गेली आहे. परिणामी पावसाळ्यात प्रसंगी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता या तलावांची किंवा स्ट्रक्चरी दुरुस्ती करणे क्रमप्राप्त ठरत आहे. त्यासंदर्भाने शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार गेल्या वर्षी जिल्हा परिषदेंतर्गतच्या ८५१ अशा स्ट्रक्चरची पाहणी व तपासणी करण्यात आली. त्यातील धोकादायक ठरू पाहणाऱ्या किंवा प्रसंगी धोका निर्माण होण्याची शक्यता असलेल्या १८० तलावांच्या ठिकाणी अतिआवश्यक असलेल्या व तात्पुरत्या स्वरूपाच्या दुरुस्तीच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यातील अत्यावश्यक ठिकाणी त्वरित कामेही करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोबतच अन्य कामेही पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात येणार आहेत.जाेरदार पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक तलाव फुटले हाेते. त्यामुळे पीके पाण्यात गेली हाेती. तलाव फुटू नये यासाठी प्रशासनाकडून उपाय याेजना करण्यात येणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

तीन टप्प्यांत होणार कामेजिल्हा परिषदेंतर्गतची ही कामे तीन टप्प्यांत करण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ६२, दुसऱ्या टप्प्यात १०१ व तिसऱ्या टप्प्यात ३५ ठिकाणची कामे केली जाणार आहेत. त्यानुषंगाने पहिल्या टप्प्यातील ६२ ठिकाणची कामे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी २६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी पवन पाटील यांनी सांगितले.

चार उपविभागांत कामेमृद व जलसंधारण विभागाच्या बुलडाणा उपविभागात २३, देऊळगाव राजा उपविभागात १०, खामगाव उपविभागात २२ आणि मेहकर उपविभागात सात कामे प्रस्तावित आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आले असून, त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. निधी उपलब्ध होताच ही कामे प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्यात येतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा