शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुपदरी मार्गाची पाहणी करा, अन्यथा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST

संबंधित कंत्राटदार व इंजिनीअर यांच्या संगनमताने हे रस्त्याचे काम नियमानुसार, आराखड्यानुसार होत नाही आहे, लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ...

संबंधित कंत्राटदार व इंजिनीअर यांच्या संगनमताने हे रस्त्याचे काम नियमानुसार, आराखड्यानुसार होत नाही आहे, लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्याचा आकार हितसंबंध जपण्यासाठी कमी-अधिक करण्यात आला आहे. रस्त्याचा पृष्ठभाग खाली-वर अशा स्वरूपाचा झाला असल्याने त्रासदायक होत आहे. त्यामुळे नागरिक नाराज आहेत. पोलीस स्टेशन ते खालचे बस स्टॅण्डपर्यंत आधी रुंद व मजबूत नाल्या दोन्ही बाजूने करणे क्रमप्राप्त असताना आधी रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉक टाकणे, नाल्या बांधणे यासाठी निमुळती जागा ठेवण्यात आली आहे. या सर्व त्रुटींना कंत्राटदार जबाबदार आहे. एक तर येथे नवीन तहसील कार्यालय होत आहे. तेसुद्धा याच रस्त्यावर आहे. संत गजानन महाराज मंदिरसुद्धा याच रस्त्यावर आहे. तेथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला जातात. याच रस्त्यात सहा महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. समृद्धी महामार्ग जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. भविष्यात मेट्रोसुद्धा याच महामार्गावरून होणार आहे. हा रस्ता पुढील ५० वर्षांसाठी होणारा आहे. हे डोळ्यासमोर ठेवून याचा विचार करण्यात यावा. रस्त्याचा मध्य काढून रस्ता करायला पाहिजे होता, पण तसे न होता दहा लोकांचे अतिक्रमण तसेच ठेवून दुसऱ्या बाजूने (विरुद्ध दिशेने) दहा लोकांनी केलेल्या अतिक्रमणासाठी लाखो लोकांच्या जीवाशी खेळणे योग्य ठरणार नाही. हा मेहकर शहराचा प्रमुख रस्ता आहे. रस्ता अरुंद राहिल्यास व दुभाजक न केल्यास मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरिक अपघाताचे बळीसुद्धा होऊ शकतात. या कामात आपण व्यक्तिगत लक्ष द्यावे, अशी लोकभावना असून, या मागणीसाठी १ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.