शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध देशी दारूची वाहतूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:51 IST

अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर पो.स्टे.हद्दीतील उंद्री शिवारामध्ये  कार व दोन मोटारसायकलने अवैध देशी दारूची वाहतूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी कार्यवाही केली.  यामध्ये ४१ हजार ३२0 रुपयांची देशी दारू व तीन मोबाइल व वाहनांसह एकूण दोन लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला.

ठळक मुद्देउंद्री शिवारातील घटना दोन लाख ५0 हजारांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर पो.स्टे.हद्दीतील उंद्री शिवारामध्ये  कार व दोन मोटारसायकलने अवैध देशी दारूची वाहतूक करणार्‍या पाच जणांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी कार्यवाही केली.  यामध्ये ४१ हजार ३२0 रुपयांची देशी दारू व तीन मोबाइल व वाहनांसह एकूण दोन लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला.अमडापूर पो.स्टे.ला नव्याने रूजू झालेले विक्रम पाटील यांनी पो.स्टे.चा पदभार स्वीकारताच अवैध धंदेवाल्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे.  १८ सप्टेंबर रोजी उंद्री शिवारात अवैध देशी दारू वाहतूक होत असल्याची माहिती अमडापूर ठाणेदार विक्रम पाटील यांना मिळाली. त्यावरून रात्री १.३0 वाजेला एएसआय शेख युनूस, पोना संजय नागवे, सुनील चौधरी, विजय बेडवाल, हरिभाऊ चव्हाण, शे.मुसा व चालक नीलेश वाकडे यांनी ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंद्री शिवारामध्ये अवैध देशी दारू वाहतूक करणार्‍यांवर पाळत ठेवून आरोपी गणेश चिंचोले, दयाराम चिंचोले, बालचंद चिंचोले, सचिन चिंचोले सर्व रा.उंद्री यांना पकडून त्यांचे ताब्यातून अवैध देशी दारूची वाहतूक करणारी कार एम.एच.३0 डी १६३८ व दोन मोटारसायकल एमएच २८ एएल ९२९१, एमएच २८ डब्ल्यू ३१२0 या दोन मोटारसायकली किंमत ७५ हजार रू. व मारोती कार किंमत एक लाख वीस हजार या वाहनावर १६ बॉक्स देशी दारू शिशा किंमत ४१ हजार ३२0 व तीन मोबाइल असा एकूण दोन लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला.  आरोपी गणेश चिंचोले, दयाराम चिंचोले, बालचंद चिंचोले, सचिन चिंचोले यांना अटक केली, तर यातील मारोती कारचालक शेख रशिद ऊर्फ रईस रा.उंद्री हा फरार होण्यात यशस्वी झाला. सदर आरोपी विरुद्ध अप.२२९/0१७ कलम ६५ (ड) अ (ई) दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध व्यवसायिकांनी त्यांचे अवैध धंदे बंद करून सनदशिर मार्गाने स्वत: चा उदरनिर्वाह करावा, अन्यथा त्यांच्याविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जप्त केलेली अवैध देशी दारू कुणाच्या दुकानातून आणण्यात आली, याचा शोध सुरू आहे. - विक्रम पाटील, ठाणेदार अमडापूर