शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

महाराजा अग्रसेन खासगी बाजार समितीच्या अनागोंदीची चौकशी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:53 IST

महाराजा अग्रसेन खासगी बाजार समितीमध्ये अनागोंदी कारभार होत असल्याने, तसेच शे तकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या बाजार समितीत अनागोंदी कारभाराची चौकशी करावी व खासगी बाजाराचे लायसन्स रद्द करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देरयत क्रांती संघटनेची जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : स्थानिक एमआयडीसी स्थित महाराजा अग्रसेन खासगी बाजार समितीमध्ये अनागोंदी कारभार होत असल्याने, तसेच शे तकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या बाजार समितीत अनागोंदी कारभाराची चौकशी करावी व खासगी बाजाराचे लायसन्स रद्द करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे दीपक सुरडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन कृषी पणन राज्यमंत्नी सदाभाऊ खोत यांनासुद्धा देण्यात आले आहे. या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, महाराजा अग्रसेन खासगी बाजारात समितीमध्ये विक्रीसाठी येणार्‍या शे तमालाचा लिलाव केला जात नाही. परिणामी शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे, तसेच या खासगी बाजार समितीच्या कागदपत्नामध्ये खाडाखोड करून क्षेत्न वाढवलेले आहे, तर खासगी बाजारासाठी आवश्यक असलेली जमीन पाच एकर नस तानादेखील खाडाखोड करून क्षेत्न वाढवलेले आहे. ही एक प्रकारे शासनाचीही फसवणूक करून लायसन्स मिळवले असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये केला आहे. तसेच बाजार समि तीमध्ये लिलाव होत नसल्याने व्यापारीही खरेदीसाठी येत नाहीत. या खासगी बाजार समितीचे मालक अग्रवाल यांनी परवाना घेताना हॉटेललाच शिदोरी गृह व लॉजला शेतकरी निवासस्थाने दर्शविले आहे. खरे पाहता त्या ठिकाणी त्यांचा हॉटेल, लॉजींग व लग्न कार्यासाठी मंगल कार्यालय म्हणून वापर केला जात आहे. सर्वसाधारण शेतकर्‍यांना या हॉटेलमध्ये प्रवेशही करू दिल्या जात नाही, ही वस्तुस्थिती असून, शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी- विक्रीला प्राधान्य न देता कापसावर जिनिंग करून प्रक्रिया करण्याचा उद्योग चालविला जात आहे, तसेच खासगी बाजारात झालेल्या व्यवहाराचे बाजार भाव ऑनलाइन प्रसिद्ध केल्या जात नाही. यासह इतरही अनेक गंभीर आरोप या तक्रारीत केले असून, या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी व खासगी बाजार समि तीचे लायसेन्स रद्द करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे दी पक सुरडकर यांनी केली आहे. दरम्यान, संघटनेचे संस्थापक ना.सदाभाऊ खोत चिखली येथे आले असता, त्यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रयत क्र ांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, विनायक सरनाईक, विलास तायडे, सचिन पडघान, भरत जोगदंडे, अनिल चौहान, अशोक सुरडकर, प्रवीण झगरे, पंकज लंबे, अमोल व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचा इशारा चिखली येथील खासगी बाजार समितीच्या अनागोंदीची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्यासह लायसन रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना दिलेल्या तक्रारीद्वारे दिला आहे. रयत क्रांती संघटनेचे विनायक सरनाईक, दीपक सुरडकर आणि विलास तायडे यांच्या विरोधात नाफेड तूर खरेदीप्रकरणी शे तकर्‍यांची फसवणूक केल्याची तक्रार चिखली पोलीस स्टेशनला आपण स्वत: केलेली आहे. त्याचा राग मनात धरून केवळ द्वेषभावनेतून आपल्या विरोधात खोटी तक्रार केलेली आहे. विशेष म्हणजे यांना राजाo्रय असल्याने माझ्या तक्रारीनंतरही चिखली पोलिसांकडून संथगतीने तपास सुरू आहे. -अशोक अग्रवाल संचालक, महाराजा अग्रसेन खासगी बाजार समिती चिखली

टॅग्स :Marketबाजार