शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सालईबन रानभाजी महोत्सवात नाविण्यपुर्ण चवींची भुरळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 18:40 IST

Salaiban Ranbhaji Mahotsav : जळगाव जा. तालुक्यातील सालई बन येथे वनाई रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगांव : वन जैव विविधतेचे संरक्षण करणे आणि लोकांना त्याच्या औषधी फायद्यासह शिक्षित करणे या मुख्य उद्देशातून रविवारी जळगाव जा. तालुक्यातील सालई बन येथे वनाई रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. या उत्सवाला वन्य प्रेमींसह मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. महोत्सवातील ४० पेक्षा अधिक विविध रानभाज्यांची चवींची भुरळ अनेकांना पडली. तरुणाई फाउंडेशनच्या वतीने पहिलाच रविवारी आयोजित झाला. या महोत्सवात तरुणाई च्या मातृशक्तीने ४० पेक्षा रानभाज्यांची मेजवानी दिली. आबाल वृद्धांसह चवीची गोडी असलेल्यासाठी हा महोत्सव आगळी वेगळी पर्वणी ठरला. सुरुवातीला या महोत्सवाचे सकाळी ११ वाजता जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी खामगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिपक पटेल, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी स्मिता राजहंस, तालुका कृषी अधिकारी वाकोडे, अपर्णाताई संजय कुटे,  तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे, डॉ. अजित जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

गुणकारी औषधी भाज्यांची मेजवानी ! सालईबनातील पहिल्याच रानभाजी महोत्सवात रविवारी अनेकांनी ४५ ते ४५ रान भाज्यांचा स्वाद चाखला. कंदमुळं, पर्ण, पुष्प, खोड, डिंक, चिक आणि बिया, टरफलं यापासुन औषधी गुण असलेल्या भाज्यांची मेजवानी या महोत्सवात अनेकांनी चाखली. 

रानभाज्यांची यांनी केली जपणूक शीतल किशोर पडोळ, साधना तेजराव पाचरने, सुचिता श्याम उमाळे यांच्या सह तरुणाई परिवारातील मातृशक्ती सालईबन परिसरातील आदिवासी महिलांच्या मदतीने रानभाज्यांची जपणूक करीत आहेत. 

 जेनेटिकली मॉडिफाइड व संकरित बियाणी व विकसित वाणांच्या गर्दीत आपण आपलं हे धन व मूळ स्वरूप हरवू नये, तसेच रानमेव्याला लोकप्रियता, राजमान्यता व  प्रचार - प्रसार करण्यासाठी तरुणाई फाउंडेशन कडून हा उपक्रम राबविण्यात आला . - शीतल पडोळ, रानभाजी अभ्यासक, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोद