खामगाव(जि. बुलडाणा) : रेल्वे प्रवासादरम्यान युवतीच्या विनयभंगप्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी २0 एप्रिल रोजी खामगाव येथून काँग्रेसचे शहराध्यक्ष तसेच महाराष्ट्र केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी अनिल नावंदर याला अटक करून मनमाड येथे घेऊन गेले. ४ एप्रिल रोजी अनिल नावंदर याने रेल्वे प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची फिर्याद अकोला येथील २७ वर्षीय युवतीने बडनेरा रेल्वे पोलीस स्टेशनला दिली होती. या फिर्यादीवरून रेल्वे पोलिसांनी अनिल नावंदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घटनास्थळ मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने प्रकरण मनमाड रेल्वे पोलीस स्टेशनकडे वर्ग केले होते. दरम्यान, याप्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी १८ एप्रिल रोजी मनमाड येथे हजर होण्याचे समन्स अनिल नावंदर याला बजाविले होते; मात्र अनिल नावंदर हजर झाला नव्हता, त्यामुळे मनमाड रेल्वे पोलीस स्टेशनचे एपीआय बोराटे यांनी २0 एप्रिल रोजी खामगाव येथे येऊन अनिल नावंदर याला अटक केली.
विनयभंगप्रकरणी नावंदर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 02:06 IST