शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रक्रियेत सुरूवातीलाच विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:46 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. शाळांच्या नोंदणीसाठी ८ ते २२ फेब्रुवारी हा कालावधी ठेवण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली असून शाळांच्या नोंदणीकरीता आता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.  समाजातील दुर्बल व वंचीत घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीईची २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई व आयबीसह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहेत, अशा प्रकारच्या शाळा या प्रवेशासाठी पात्र आहेत. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील २३० शाळा पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, ८ फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यास सुरूवात झाली आहे. आरटीई प्रवेशपात्र शाळांची नोंदणी करण्यासाठी ८ ते २२ फेब्रुवारी असा कालावधी देण्यात आला होता. तर पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २५ फेब्रुवारी ते ११ मार्च आणि पहिली सोडत काढण्यासाठी १४ ते १५ मार्च असे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र या प्रवेश प्रक्रियेच्या सुरूवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीमध्ये आरटीई प्रवेश पात्र शाळांना आॅनलाइन नोंदणी करता न आल्याने आता शाळांच्या नोंदणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत ठेवण्यात आली आहे. परिणामी, पालकांना करावयाचे अर्ज, आॅनलाई सोडत ही सर्व प्रक्रिया पुढे ढकलली आहे. 

अर्जासाठी ५ मार्चचा मुहूर्त !आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशांतर्गत पालकांना अर्ज भरण्यासाठी  २५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया लांबल्याने पालकांच्या अर्जासाठी आता ५ मार्चचा मुहूर्त शिक्षण विभागाला मिळाला आहे. पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत ५ मार्च ते २३ मार्चपर्यंत राहणार आहे. 

 नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षाआरटईच्या प्रवेश प्रक्रियेची पालकांना सुरूवातीपासून उत्सुकता लागली होती. दरम्यान, ८ फेब्रुवारीला प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन सुरू झाली; मात्र त्यात काही व्यत्यय निर्माण झाल्याने संपुर्ण प्रक्रियेचे वेळापत्रक बदलले आहे. या नव्या वेळापत्रकाची जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागालाही प्रतीक्षा लागली आहे. 

 आरटीईची प्रवेश प्रक्रिया ८ फेब्रुवारीपासून आॅनलाइन सुरू  झाली आहे. आरटीई प्रवेश पात्र शाळांच्या नोंदणीसाठी २२ फेब्रुवारी अंतीम मुदत होती. परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे यात थोडाफार बदल झालेला आहे. आता २८ फेब्रुवारी ही नोंदणीसाठी अंतीम मुदत आहे. - एस. टी. वºहाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा