शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांक, दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:38 IST

पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी वार्षिक दोन लाख रुपये एवढ्या रकमेच्या मर्यादेपर्यंत अनुदान शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल खाजगी शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यात येत आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी ५ फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे.धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते. त्यासाठी शाळांकडून ३० नोव्हंबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. शाळांनी आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर करण्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहेत. अंतिम मुदत ५ फेब्रुवारी आहे. इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन संबंधीत विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे ५ फेब्रुवारी पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीची प्रतिक्षा न करता इच्छूकांनी तात्काळ अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देवून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी वार्षिक दोन लाख रुपये एवढ्या रकमेच्या मर्यादेपर्यंत अनुदान शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या होणार सुविधाया योजनेंतर्गत अनुदान देय असलेल्या पायाभूत सोयीसुविधा अशा शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे, ग्रंथालय अद्ययावत करणे, प्रयोगशाळा, संगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, डागडुजी करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टर, जनरेटरची सुविधा निर्माण करणे, झेरॉक्स मशीन, अध्ययनाची साधने, एलसीडी प्रोजेक्टर, अध्ययनासाठी आवश्यक विविध सॉफ्टवेअर, इंग्रजी लँग्वेज लॅब, संगणक हार्डवेअर आदी सुविधांसाठी या अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा