शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाची दाहकता वाढली, गावोगावी पीक मोडण्यावर भर

By विवेक चांदुरकर | Updated: December 14, 2023 15:31 IST

एकलारा बानोदा, काकनवाडा बुद्रुक बावनबीर येथील शेतकऱ्यांनी मोडले पीक

एकलारा बानोदा : अवकाळीचा तडाखा व त्यानंतर कटवर्म किडींचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो रूपये खर्च करून पेरणी केलेले पीक गावोगाचे शेतकरी मोडत आहेत. शेतकर्यांचा हजारो रूपयांचा खर्च व परिश्रम व्यर`थ जात आहे.

एकालारा बानोदासह संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्यांना रब्बीतील हरबरा पिकावर रोटाव्हेटर फिरवावा लागत आहे. एकलारा बानोदा येथील नितीन देशमुख, काकनवाडा बुद्रुक येथील अमोल रावणकार, बावनबीर येथील राहुल मनसुटे या शेतकर्यांनी हरभरा पीक मोडले आहे.

आधिच दुष्काळ त्यात दुबार पेरणी करावी लागणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अवकाळी पाऊस व धुके पडल्याने बुरशीजन्य रोग हरबरा पिकावर आला आहे. हरभरा पिक जळत आहे. खरिपात अतिवृष्टी झाली. त्यानंतर पावसाचा खंड पडला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुष्काळात बळीराजा भरडला गेला. त्यातुन सावरत उधार, उसणवारी करत रब्बीतील हरबरा पिकाची पेरणी केली. पिक जोमदार दिसत असतांनाच अवकाळी पाऊस सुरु झाला. या पावसानंतर पिकावर बूरशीजन्य रोगाने हल्ला करत पिक उध्वस्त केले. त्यामुळे हताश शेतकर्यांनी रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला. आता दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांपुढे उभे आहे.मी माझ्या शेतामध्ये हरभरा पिकाची लागवड केली होती. परंतु अवकाळी पाऊस व बुरशीजन्य रोग, अळी यामुळे हरभरा पिके पूर्णतः सुकत आहे. दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.- नितीन देशमुख, शेतकरी, एकलारा बानोदा

काकनवाडा शिवारात माझे शेत असून हरभरा या पिकावर मर रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे हरभरा पिक सुकत आहे. त्यामुळे हरभरा पिकात रोटावेटर फिरविले आहे. शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे. कृषी विभाग व शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- अमोल रावणकार, शेतकरी, काकनवाडा बुद्रुकमाझ्या शेतात हरभरा या पिकाची लागवड केली होती. अवकाळी पाऊस व पिकांवर झालेला प्रादुर्भाव अळीचे प्रमाण बुरशीजन्य रोग यांनी थैमान घातले आहे. त्यामुळे हरभरा मोडण्याची वेळ आली असून दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शासनाकडून मदत देण्यात यावी तसेच कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे.- राहुल मनसुटे, शेतकरी, बावनबीर

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा