शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर तालुक्यात निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:17 IST

निकृष्ट व बोगस सोयाबिन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील बहुतांश गावात पेरणीला वेग आला असतनाच, निकृष्ट आणि बोगस बियाण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कपाशी बियाण्यात नफाखोरीसाठी शेतकºयांची अडवणूक केली जात असल्याचा प्रकार ताजा असतानाच आता निकृष्ट व बोगस सोयाबिन बियाणे शेतकºयांच्या माथी मारल्या जात असल्याचे दिसून येते.संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील सुधीर देऊकार यांनी चांगेफळ येथील एका कृषी केंद्रावरून ७ जून रोजी सोयाबीन बियाण्यांचे १० बॅग विकत घेतले होते. एका बॅगीत ३० किलो बियाणे असून याची किंमत २ हजार २४० रुपये आहे. शनिवारी रात्री वानखेड येथे समाधानकारक पाऊस पडल्याने रविवारी १५ जून रोजी सकाळी देऊकार यांनी विकत आणलेल्या १० बॅग पैकी ५ बॅग पेरणी साठी शेतात नेल्या. ट्रॅक्टरने पेरणीला सुरूवात केली. सुरुवातीच्या तीन बॅगमधील बियाण्यांची पेरणी करण्यात आली. चौथी बॅग फोडली असता त्यामध्ये बुरशी लागून असलेले बियाणे दिसून आले. पाचव्या बॅगमध्ये ही याच प्रकारे निकृष्ट बियाणे होते. सर्वत्र पेरणीची लगबग सुरू असल्याने तसेच  पेरणीसाठी ट्रॅक्टर मिळत नसल्याची अडचण लक्षात घेता या शेतकºयाने त्या दोन्ही बॅगा मधील बुरशी युक्त निकुष्ट बियाणे वेगळे करून उर्वरित बियाण्यांमध्ये पेरणी आटपून घेतली. त्यानंतर त्या निकुष्ट बियाणे असलेल्या बॅगीचे व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल केला. असाच प्रकार बावनबीर येथील दोन शेतकºयांसोबत काही दिवसांपूर्वीच घडला होता. 

  चांगेफळ येथील कृषी केंद्रावरून दहा जागा विकत आणले होते. त्यापैकी पाच बॅग पेरणीसाठी घेऊन गेलो असता यातील दोन बॅग मधील बियाण्यांना बुरशी लागलेली होती.  कंपन्यांकडून निकृष्ट व बोगस बियाणे शेतकºयांची विक्री केली जात आहे. शेतकºयांची फसवणूक होऊ नये म्हणून व्हिडिओ व्हायरल केला. यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.- सुधीर देऊकारशेतकरी, वानखेड

 शेतकºयाचा व्हायरल व्हिडिओ बघितला आहे. बॅगमध्ये बुरशी युक्त बियाणे दिसून येत असून बोगस बियाणे म्हणता येणार नाही. यासंदर्भात शेतकºयाच्या तक्रारीवरून चौकशी करण्यात येणार आहे.- सी.पी. उंदरे, कृषी अधिकारीपंचायत समिती कार्यालय संग्रामपूर

या संदर्भात शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास सोयाबीन बियाण्यांच्या लाॅट नंबर ची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी केल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

- अमोल बनसोडतालुका कृषी अधिकारीसंग्रामपूर

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र