शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनातून सावरलेल्या बालकांना एमएसआय-सी आजाराचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST

संदीप वानखडे बुलडाणा : काेराेनाची तिसरी लाट येणार असल्याची, तसेच यामध्ये लहान बालके संसर्गीत हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ...

संदीप वानखडे

बुलडाणा : काेराेनाची तिसरी लाट येणार असल्याची, तसेच यामध्ये लहान बालके संसर्गीत हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच काेराेनातून सावरलेल्या बालकांना मल्टि-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमएसआय-सी) हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे. या आजाराने ग्रस्त एका बालकावर उपचार सुरू आहेत. आजाराचा धाेका पाहता आराेग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

काेराेनाची दुसरी लाट शहरांसह ग्रामीण भागात पाेहोचली हाेती. काेराेनामुळे अनेक जण गंभीर बनल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले हाेते. काेराेनाने अनेकांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात ४३० पेक्षा जास्त बालकांना काेराेना संसर्ग झाला हाेता. काेराेनातून सावरलेल्या बालकांना आता एमएसआय-सी हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे. या आजारामुळे मुलांना अंगात ताप भरतो. तसेच हा आजार हृदय, मेंदू आणि फुप्फुस अशा महत्त्वाच्या भागांवर हल्ला करतो. तसेच लहान मुलांमध्ये तीन ते पाच दिवस ताप, तीव्र पोटदुखी तसेच रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे सुद्धा आजारात जाणवतात. त्यामुळे, काेराेनातून बरे झालेल्या मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच तिसऱ्या लाटेत मुलांना काेराेना संसर्ग हाेऊच नये यासाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे.

अशी आहेत लक्षणे...

मुलांना खूप ताप येणे, पाच दिवसांपर्यंत ताप कमी न हाेणे

मुलांच्या पाेटात दुखणे

मळमळ हाेणे, उलट्या हाेणे

स्कीनवर रॅशेस पडणे

डाेळे लाल हाेणे

ही घ्यावी काळजी...

काेराेनातून बरे झालेल्या मुलांकडे लक्ष द्यावे

काेराेना हाेऊच नये यासाठी मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नये

सतत ताप असल्यास किंवा तीव्र पाेटदुखी असल्यास डाॅक्टरांना दाखवावे

मुलांमध्ये लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये

मुलांना पाैस्टिक भाेजन द्यावे

काेराेनातून बरे झालेल्या शून्य ते १९ वर्षांच्या मुलांना मल्टि-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार हाेत आहे. या आजाराची लक्षणे दिसताच तातडीने डाॅक्टरांना दाखवावे. तसेच मुलांना काेराेना हाेऊच नये यासाठी उपाययाेजना कराव्यात. काेराेनातून मुले सावरली असली तरी, त्यांच्याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे.

- डाॅ़ नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक

बालकांना झाला काेराेना

४३०

जिल्ह्यातील एकूण काेराेना रुग्ण

८६,२९३

काेराेनावर मात केलेले रुग्ण

८५५२९

एकूण मृत्यू

६५४

उपचार घेत असलेले रुग्ण

११०