उपचाराअभावी नवजात बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 03:22 PM2019-11-30T15:22:29+5:302019-11-30T15:22:37+5:30

रुग्णवाहिका न पोहोचल्याने खासगी वाहनाने तिला संग्रामपूर येथे नेत असतााच वाटेतच त्या प्रसूत झाल्या.

 Infant death due to lack of treatment | उपचाराअभावी नवजात बालकाचा मृत्यू

उपचाराअभावी नवजात बालकाचा मृत्यू

Next

संग्रामपूर : उपचार वेळेवर न मिळाल्याने तालुक्यातील पळशी झाशी येथे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
पळशी झाशी येथील योगिता शंकर दुगाने या महिलेच्या प्रसुतीपूर्वी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी शासकीय रुग्णवाहिकेसाठी फोन करण्यात आला. मात्र एक तासानंतरही रुग्णवाहिका न पोहोचल्याने खासगी वाहनाने तिला संग्रामपूर येथे नेत असतााच वाटेतच त्या प्रसूत झाल्या.
उपचारासाठी नवजात बालक व आईला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले परंतु त्या ठिकाणी डॉक्टर हजर नसल्याने उपचार होऊ शकले नाही. परिणामी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आरोप शंकर दुगाने यांनी केला. बालकाच्या आईची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर शेगाव येथे उपचार होत आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागावर स्थानिक नागरिक रोष व्यक्त करत आहेत. संग्रामपूर आरोग्य केंद्रात दोन आरोग्य सेविकेची पदे असताना दोन्ही रिक्त आहेत. चार उपकेंद्र मिळून दोनच आरोग्य सेविका असल्याने येथे समस्या आहे.


माझ्या पत्नीला प्रसवपूर्व कळा सुरु होताच १०८ क्रमांकावर संपर्क केला. रुग्णवाहिकेची मागणी केली. रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने खाजगी वाहन घेऊन यावे लागले. तासभर पूर्वी रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर आई व बाळाला वेळेवर उपचार मिळाले असते. तर ही घटना टळली असती.
- शंकर दुगाने
पळशी झाशी

Web Title:  Infant death due to lack of treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.