शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 11:19 AM

Industry in Buldana district : केवळ ४४३ उद्योग सुरू असून, उर्वरित ४२३ उद्योगांना कुलूप लागले आहे.

- भगवान वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आधीच मागासलेला असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगाना मरगळ आलेली असतानाच त्यामध्येच कोरोनाने आगीत तेल ओतून उद्योगनगरींना होत्याचे नव्हते करून टाकले आहे. जिल्ह्यातील सात एमआयडीसीत परवानगी मिळालेल्या ८६६ उद्योगांपैकी केवळ ४४३ उद्योग सुरू असून, उर्वरित ४२३ उद्योगांना कुलूप लागले आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश रोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण सात औद्योगिक वसाहती आहेत. या सात वसाहतीमध्ये तब्बल ८६६ उद्योगाना परवानगी देण्यात आली होती. बुलडाणा जिल्ह्यात उद्योगांना लागणारे पाणी, कुशल मजूर वर्ग, सोबतच अपुरी वाहतूकीचे संसाधने यामुळे जिल्ह्यातील सात एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी आपले उद्योग बाहेर राज्यात हलविले असल्याचीही माहिती आहे. असे जरी असले तरी आहे त्या संसाधनावर उद्योग सुरू ठेवणाऱ्या  उद्योजकांना मागील काही काळापासून कोरोनाने मोठा फटका दिला आहे. यामुळेच की काय मागील दोन वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील ४२३ उद्योग बंद पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  कोरोनामुळे उद्योग क्षेत्रातील अर्थकारणालाही मोठा फटका बसून काही उद्योग डबघाईस आलेले आहेत.

यामुळे नाही विकास जिल्ह्यात खामगाव वगळता दुसरी कोणतीही मोठी बाजारपेठ नाही, जिल्ह्यात केवळ कच्चा माल हा शेती उद्योगाचा असून, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही, मोठे उद्योजक येण्यास तयार नाहीत. मूलभूत सूविधा आणि आकर्षक वेतनाअभावी कुशल कामगार येण्यास धजत नाहीत. तर बाहेर राज्यातून आणावा लागणारा कच्चा माल जिल्हाभर पोहचविण्यासाठी आवश्यक ती रेल्वेलाईन नाही. या आणि अशा अनेक कारणाने जिल्ह्यातील उद्योगाना मरगळ आली आहे.

उद्योग बंद पडण्याचे प्रत्येक ठिकाणची वेगळी कारणे आहेत. मात्र यामध्ये वाहतुकीच्या अडचणी हे सगळ्यात महत्वाचे कारण आहे. विशेष म्हणजे स्थानिक मजूर वर्ग मिळत नसल्यानेही अनेकांनी आपले उद्योग बाहेर ठिकाणी हलविले आहेत.    - ए.टी. बोबडे, उपअभियंता, औद्योगिक वसाहत,खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMIDCएमआयडीसी