शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उंद्री : ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:22 IST

उंद्री: सत्ताधारी भाजपाला धडा देत काँग्रेसने सरपंच पदाची मुसंडी  मारत पक्षीय बलाबलातही उपसरपंच पदावर दावा केला आहे.  सर्व जिल्हय़ाचे लक्ष असलेल्या उंद्री ग्रा.पं.वर अखेर काँग्रेसचा  झेंडा फडकला. 

ठळक मुद्देभाजपाला धक्का; काँग्रेसला बहुमतसरपंचपदी - प्रदीप आंभोरे

लोकमत न्यूज नेटवर्कउंद्री: सत्ताधारी भाजपाला धडा देत काँग्रेसने सरपंच पदाची मुसंडी  मारत पक्षीय बलाबलातही उपसरपंच पदावर दावा केला आहे.  सर्व जिल्हय़ाचे लक्ष असलेल्या उंद्री ग्रा.पं.वर अखेर काँग्रेसचा  झेंडा फडकला. अनेक दिग्गज उंद्रीच्या सरपंच पदाच्या रिंगणात होते. काँग्रेसमध्ये  नुकताच प्रवेश घेतलेले प्रदीप आंभोरे यांनी जोरदार मुसंडी मारत  सरपंच पदीची माळ गळय़ात घातली. उंद्री जि.प.व पं.स. गणात  भाजपाला निवडून देणार्‍या जनतेने मात्र ग्रा.पं.ला भाजपाला  धक्का देत काँग्रेसला बहुमतात निवडून दिले. सरपंचपदी प्रदीप  आंभोरे तब्बल अंदाजे ४00 बहुमताने निवडून आले. या  निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचे एकूण ५ सदस्य निवडून  आले. यामध्ये वार्ड क्र.१ मध्ये शकुंतला रामभाऊ पारखेडे  काँग्रेस पॅनलच्या तर भाजपा प्रणित पॅनलचे गणेश काळे व गो पाल जगताप निवडून आले. तर वार्ड क्र.२ मध्ये काँग्रेस प्रणित  पॅनलचे शकुंतला रामभाऊ पारखेडे, जितेंद्र राऊत तर भाजपा  प्रणित पॅनलचे स्वाती राजू लाहुडकार विजयी झाल्या. वार्ड क्र.३  मध्ये काँग्रेस प्रणित पॅनलचे शिवा दांदडे पाटील तर भाजपा प्रणित  पॅनलचे अशोक हातागळे व कळसकर हे विजयी झाले वार्ड  क्र.४ मध्ये भाजपा प्रणित पॅनलच्या कमलबाई तेलरकर, काँग्रेस  पॅनलचे रमेश पाटील व अविरोध म्हणून सुनीता झिने विजयी  झाल्या. वार्ड क्र.५ मध्ये भाजपा प्रणित पॅनलच्या सुनीता गणेश  जगताप तर अविरोध संदीप अंभोरे व अपक्ष शे. रफिक शे.  बुर्‍हाण विजयी झाले. यामध्ये काँग्रेसच्या ५ मधून एक सदस्य  दोन ठिकाणी विजयी झाले तर भाजपाचे सात अपक्ष एक व  अविरोध दोन असे सदस्य निवडून आले. यानंतरची उपसरपंच  पदाची निवड ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.  या निवडणूकीत आमदार राहुल बोंद्रे यांनी विशेष लक्ष देऊन व  उंद्रीचे दौरे करून सरपंच पदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची  बनवली होती. यामध्ये सत्ताधार्‍यांना धक्का देत काँग्रेसने सरपंच पद खेचून आणण्यास यश मिळविले. आता सर्व लक्ष उपसरपंच  पदाच्या निवडीवर केंद्रित आहे व ही निवड अत्यंत चुरशीची  ठरेल.