शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप स्पर्धेत बुलडाण्याची ‘एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:41 IST

शहरातील धर्मवीर आखाड्याच्या तालमीतील १० खेळाडूंची इंडो-नेपाळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये कबड्डी स्पर्धेत ७ तर थाळीफेक, गोळाफेक व रनिंगमध्ये प्रत्येकी एक खेळाडू सहभागी होणार आहे.

- सोहम घाडगेबुलडाणा : इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप २०२० स्पर्धा २० ते २३ जानेवारीदरम्यान नेपाळमधील पोखरा शहरात होणार आहे. या स्पर्धेसाठी कबड्डी व अ‍ॅथलेटिक्स प्रकारात जिल्ह्यातील १० खेळाडूंची निवड झाली आहे. खेळाडूंच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बुलडाण्याची दमदार एंट्री पाहायला मिळणार आहे.आरोग्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे आहेत. मुलांनी किमान एक तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळांनीही अभ्यासासोबतच खेळांकडेही ध्यान दिले पाहिजे. मुलांना शालेय शिक्षण मिळालेच पाहिजे यात शंका नाही; मात्र बहुतांश वेळा आपण अभ्यासापुढे खेळाला महत्त्व देत नाही. खेळामधून मुले वागणे, बोलणे शिकत असतात, हे आपण विसरून जातो. मुलांच्या जडणघडणीत खेळाची भूमिका महत्त्वाची असते. बुलडाण्यात सुरुवातीपासून खेळासाठी पोषक वातावरण आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक मिळविला आहे. शहरातील धर्मवीर आखाड्याच्या तालमीतील १० खेळाडूंची इंडो-नेपाळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये कबड्डी स्पर्धेत ७ तर थाळीफेक, गोळाफेक व रनिंगमध्ये प्रत्येकी एक खेळाडू सहभागी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची मान आणखीच उंचावली आहे. नेपाळमधील इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर एप्रिल महिन्यात थायलंडमध्ये स्पर्धा होणार आहेत. साधारण मार्च महिन्यात हरियाणात या स्पर्धेसाठी शिबिर होणार असल्याची माहिती मिळाली. निवड झालेले खेळाडूइंडो-नेपाळ स्पर्धेत कबड्डी खेळात राजवर्धन कोळी, तिलक तोंडीलायत, गणेश वायाळ, पवन चौबे, सौरभ चौबे वेगवेगळ्या वयोगटात व योगेश उगले खुल्या गटात सहभागी होणार आहेत, तर चेतन सांबरे गोळाफेक, महेश जाधव, सतीश उगले रनिंग व ऋषिकेश महाजन थाळीफेकमध्ये आपले कौशल्य दाखविणार आहे. कोल्हापूर येथे राज्यस्तर व गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तर स्पर्धेतून या खेळाडूंची नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळात प्रसंगावधान, डावपेच महत्त्वाचे आहेत. धर्मवीर आखाड्यात खेळाडूंना उत्तम सुविधा दिल्या जातात. दरररोज सायंकाळी त्यांचे वर्कआउट घेण्यात येते. कौशल्य विकसित करण्यावर भर दिल्या जातो. इंडो- नेपाळ स्पर्धेत खेळाडू नक्कीच यश मिळवतील.- मो. इद्रिस मो. अय्युब मकरानीप्रशिक्षक, धर्मवीर कबड्डी संघ 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाKabaddiकबड्डी