शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारतीय संस्कृतीने अमेरिका समृध्द होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:59 IST

भारताची परंपरा व संस्कृती अगाध असून त्याच्या आदान प्रदानाने अमेरिका नक्कीच समृध्द होईल. तसेच भारतीय शिक्षण प्रणालीतून युरोपीय देश अनेक संकल्पना आत्मसात करतात, असे प्रतिपादन टिचर्स फॉर ग्लोबल क्लासरुम प्रकल्पाअंतर्गत संस्कार

संस्कार ज्ञानपीठ प्रशालेत अमेरिकन शिक्षकांचे प्रतिपादन

खामगाव :  भारताची परंपरा व संस्कृती अगाध असून त्याच्या आदान प्रदानाने अमेरिका नक्कीच समृध्द होईल. तसेच भारतीय शिक्षण प्रणालीतून युरोपीय देश अनेक संकल्पना आत्मसात करतात, असे प्रतिपादन टिचर्स फॉर ग्लोबल क्लासरुम प्रकल्पाअंतर्गत संस्कार ज्ञानपीठ येथे अभ्यास दौºयावर आलेल्या रॉबनी हॅरीसन व मेरील बेल यांनी पालकांशी संवाद साधताना केले.मेरील बेल व रॉबनी हॅरीसन या सामाजिक शास्त्राच्या शिक्षिका अमेरिकन अभ्यासक्रमातील भारतीय इतिहास अभ्यासण्यासाठी भारत दौºयावर आलेल्या आहेत. तेथील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव व दस्तावेज देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील संस्कार ज्ञानपीठ या शाळेची निवड टिजीसी प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली.संस्कार ज्ञानपीठ येथील कार्यक्रमातील भारतीय परंपरा, संस्कृती व आदरतिथ्याच्या सजीव चित्रणाने अमेरिकन शिक्षिका  भारावून गेल्या होत्या. सर्वप्रथम महाराष्ट्रीय फेटे बांधुन त्यांचे कुंकुम तिलकाने पारंपारीक स्वागत करण्यात आले. शाळेतील दररोजची प्रार्थना पध्दती, शिक्षण आदान प्रदान पध्दती, विविध परिक्षांचे मुल्यांकन, शाळेतील अभिनव प्रकल्प, सांस्कृतिक वारसा, बालमानसशास्त्र, अभ्यासक्रमातील सहविषय, आदिंचे विस्तृत अध्ययन त्यांच्यामार्फत करण्यात आले. भारतीय वेशभुषा, खानपान, पारंपारीक खेळ, आतिथ्य यांचा समन्वय साधणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या समक्ष प्रस्तुत करण्यात आला.अमेरिकन शिक्षकांना शाळेतर्फे खादीचा पोशाख तसेच चरखा देवून गौरविण्यात आले. शाळेचे अध्यक्ष सागर फुंडकर, उपाध्यक्ष आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर, संचालक अमित किर्तने यांनी टिजीसी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत धर्माधिकारी, प्रमुख उपस्थितीत टिजीसीचे राजेश पाटील, शेखर खोमणे, मुख्याध्यापिका भावना चितलांगे यांच्यासह पालकवर्गाचा समावेश होता. कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी समर्थपणे सांभाळली. 

अमेरीकन शिक्षिकांनी धरला लावणीचा ठेका यावेळी अमेरिकन शिक्षिकांनी यावेळी लावणी नृत्याचे प्रशिक्षण घेतले. भारतीय पारपांरिक खेळ जसे, डिग्गर, चंपोल, पेबल्स सारखे खेळ प्रत्यक्ष कृतीतून शिकल्यात. पुरणपोळी, करंज्या, बाजरी भाकरी, कढी आदी बनविण्याचे प्रशिक्षण घेतांना त्या आनंदी दिसून आल्या.