शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे , शाळांचा शुल्कासाठीही तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 10:33 IST

स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे व शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी लावलेला तगादा यामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या असून, शहरातील शाळांत विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढत आहे. मात्र, स्कूल बसचालकांनी वाढविलेले भाडे व शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी लावलेला तगादा यामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोना महामारीमुळे गत नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिकता येत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रात मरगळ आली आहे. अनेकांचे रोजगार कमी झाले असून, व्यापारावरही मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक मंदीचा काळ सुरू असतानाच दुसरीकडे महागाईने कळस गाठला आहे. अन्नधान्य, खाद्यतेल तसेच पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. कोरोनानंतर महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या पाल्याच्या शिक्षणाची चिंता लागली आहे. शहरातील खासगी शाळेत शिकणाऱ्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क, तसेच स्कूल बसचे भाडे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. अशातच काही शाळांनी शैक्षणिक शुल्क पूर्ण भरण्यासाठी पालकांना सूचना दिल्या आहेत. 

स्कूल बसचे शुल्क केले दुप्पट विद्यार्थ्यांची शाळेला ने-आण करणाऱ्या स्कूल बसचालकांनी वाढत्या तेलाच्या किमती व मागील आठ, नऊ महिन्यांपासून वाहने बंद असल्याने बुडालेला रोजगार यामुळे स्कूल बसचालकांनी नेहमीच्या दरात वाढ केली आहे. एका विद्यार्थ्यासाठी ६०० रुपये शुल्क असताना आता एक हजार रुपये शुल्क स्कूल बसचालक मागत आहेत. त्यामुळे पाल्यांना शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे अनेक पालक  पाल्यांना स्वतः शाळेत घेऊन जात आहेत.

पालकांचा विरोधमात्र आठ, नऊ महिन्यांपासून शाळा बंद असतानाही वार्षिक शुल्क पूर्ण कसे द्यावे, संगणक, प्रशिक्षण, मैदान व इतर शाळेतील कोणत्याही गोष्टीचा वापर न करता केवळ ऑनलाइन शिक्षणासाठी पूर्ण शुल्क आकारले जात आहे. दरम्यान, एका खासगी शाळेतील पालकांनी आक्रमक भूमिका घेऊन पूर्ण शुल्क भरण्यास विरोध दर्शविला असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव