शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 11:53 IST

Crop Loan News जिल्ह्यातील १४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्यावर्षी उद्दिष्टांपेक्षा १६ टक्के अधिक पीककर्ज वाटप करणाऱ्या जिल्हा बँकेने आगामी आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटपाची भूमिका घेतली असून त्यासाठी चालू आर्थिक वर्षातील थकित पीककर्ज ३१ मार्चच्या आत भरल्यास अशा शेतकऱ्यांना वाढीव पीककर्जदराने पीककर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा बँकेने हालचाली सुरू केल्या आहेत. याचा जिल्ह्यातील १४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.जिल्हा बँकेला गेल्या पाच वर्षांपूर्वी केंद्र, राज्य शासन आणि नाबार्डने मदत केल्यानंतर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली होत आहे. त्यातच बँकेमध्ये गुंतवणूकही झाली असून बँकेने शेअर्सद्वारा भांडवल उभारणीस प्रारंभ केला आहे. परिणामस्वरूप सुरक्षित कर्जवाटपास जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रारंभ केला आहे. बँकेचे सीआरएआरचे प्रमाणही आता १७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी जिल्हा बँकेच्या ७० शाखांद्वारे ७२ कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप केले होते. अग्रणी बँकेने ६२ कोटींचे उद्दिष्ट दिले असता जिल्हा बँकेने ७२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. एकूण उद्दिष्टांच्या १६ टक्के अधिक पीककर्ज बँकेने वाटप केले आहे. त्यानुषंगाने जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीककर्जाचा ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी भरणा केल्यास त्यांना जिल्हा बँक वाढीव पीककर्जदराने नवीन कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी सांगितले. गेल्यावर्षी ४७ ग्रामीण शाखा आणि २३ सेमी अर्बन भागातील शाखांद्वारे जिल्हा बँकेने हे पीककर्ज वाटप केले होते. परिणामी आगामी आर्थिक वर्षात जिल्हा बँक शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज देण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी