नागेश मोहिते धाड (बुलडाणा), दि.२३- खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे यावर्षी बर्यापैकी उत्पादन शेतकर्यांना मिळाले आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत शेतमालास भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सध्या रब्बीचा हंगाम आटोपला असून गहू, हरबरा, मका हय़ा पिकांची सोंगणी व मळणी सुरु आहे. तर या भागातील प्रमुख असणारे पिक सोयाबीनचे भाव वाढतील वाढतील या आशेवर बहुतेक शेतकर्यांनी खरीपाचे सोयाबीन विक्री केली नाही, पाऊसमान चांगले राहिल्याने शेतकर्यांचे डोक्यावरचे कर्ज, कमी होऊन हाताशी चारपैसे राहतील अशी अपेक्षा असतांना मात्र आजरोजी सोयाबीनचे दर प्रती क्विंटल २७00 रुपये आहे. तर मागील वर्षी हाच दर ३८00 रुपये पर्यंत होता. परिणामी सध्याच ११00 रुपये प्रती क्विंटल नुकसान भावाच्या फरकाचे शेतकर्यांना होत आहे. तर खरीपाची मका व रब्बीची मका अशी एकत्रीत रित्या सध्या मळणी हंगाम सुरु आहे. हय़ाच मकाचा दर मागील वर्षी १७00 रुपये होता. तर सध्या १३00 रुपये मकाला दर आहे. परिणामी मकाला ४00 ते ५00 रुपये भावातच नुकसान शेतकर्यांना होत आहे. यावर्षी हरबरा पिकास मागील वर्षीपेक्षा चांगले दर आहेत. सध्या ५५00 रुपये प्रती क्विंटलचा दर असल्याने हरबरा पीक लाभकारक ठरले आहे. तर दुर्दैवाने यावर्षी धाड शिवारात हरबरा पिकाची पेरणी अत्यल्प राहिल्याने शेतकर्यांना त्याचा लाभ होणार नाही. एकंदरीत उत्पादन बर्यापैकी हाती आले तरी मिळणारा दरच शेतकर्यांना घातक ठरत आहे. त्यातही शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजारात विक्रीस घेऊन जात आहे. परंतु व्यापारी वर्ग ह्यएकरकमी पैसाह्ण देण्यात येत नसल्याने शासनाच्या नवीन धोरणामुळे शेतकर्यांना चेकच्या स्वरुपात पैसे मिळत आहे. तसेच बॅकेतूनही मोठी रक्कम शेतकर्यांना मिळत नसल्याने येथे शेतकर्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकूणच शेतकरी हय़ा विचित्र परिस्थितीत अडकलेला असून शेतकरी आर्थिक संकाटता सापडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे. शेतमालाला भाव नाही, कर्जाचा डोंगर उभारला आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकर्यास मदत करणे गरजेचे झाले आहे.खरीप आणि रब्बी हंगाम चांगला राहीला डोक्यावरचे कर्ज फिटून हाती पैसा मिळेल अशी आशा होती. परंतु शेतमालाचे भाव मातीमोल झाल्याने हाती काहीच येत नाही.- अरुण जाधवशेतकरी, धाडपावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने उत्पादन बर्यापैकी झाले आहे. मात्र आता शेतमालाचे दर पडल्याने कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला असून, कर्जमाफी शिवाय पर्याय नाही.- दिलीप वाघशेतकरी, धाड
उत्पादनात वाढ; भाव मात्र घटले!
By admin | Updated: March 24, 2017 01:32 IST